HSC Result 2025 Date : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या. पेपर तपासणी अंतिम टप्प्यात असून सर्वच विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे. अशातच बारावीच्या परीक्षेच्या निकालाची संभाव्य तारीख समोर आली आहे. रिपोर्टनुसार, बारावीचा निकाल गतवर्षीपेक्षा यंदा काही दिवस लवकर जाहीर केला जाऊ शकतो. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल घोषित केला जाऊ शकतो.
ADVERTISEMENT
दरम्यान, बारावीच्या निकालाची तारीख अद्यापही शिक्षण मंडळाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नाहीय. दोन्ही परीक्षा मार्च महिन्यात संपल्या असून आता पालकांसह सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा आहे. शिक्षण विभागाकडून उत्तरपत्रिका तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. एचएससी परीक्षेचा हा निकाल राज्य मंडळाच्या इतिहासातील सर्वात जलद निकाल असेल, असं बोललं जात आहे. एसएससी आणि एचएससी या दोन्ही परीक्षेचा निकाल mahresult.nic.in या बेवसाईटवर पाहू शकता.
हे ही वाचा >> पुण्यात खळबळ, शीर कापलं, तळहात आणि पायही कापून फेकले अन्... हादरवून टाकणारं प्रकरण तरी काय?
यंदा 15 लाख विद्यार्थी बसले बारावीच्या परीक्षेला
महाविद्यालयात ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने प्रवेश दिला जातो. तसच इन हाऊस अॅडमिशनही सुरु असतात. त्यामुळे अॅडमिशनची प्रोसेसची तयारी करण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे. 11 फेब्रुवारी ते 11 मार्च या महिनाभराच्या कालावधीत राज्यात बारावीच्या परीक्षा पार पडल्या. जवळपास 15 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. मे महिन्याच्या सुरुवातीला बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा >> LPG Price Hike: मोदी सरकारने दिला जोरदार झटका, घरगुती LPG सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ
राज्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. अशातच राज्य मंडळाने परीक्षांचे आयोजन लवकर केले. मे महिन्यातच दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याचं समजतं. तसच जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पुरवणी परीक्षाही घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती समोर आलीय.
ADVERTISEMENT
