सगळ्यात आधी 'या' माणसाने बनवला Ghibli फोटो, तो पण बायकोसोबत... नंतर काय जगभर झाला Viral

Grant Slatton, ही तीच व्यक्ती आहे ज्याने पहिल्यांदा Ghibli AI Image शेअर केली होती आणि अवघ्या काही तासात तो फोटो व्हायरल झाला होता. जाणून घेऊया याबाबत सविस्तर.

सगळ्यात आधी 'या' माणसाने बनवला Ghibli फोटो

सगळ्यात आधी 'या' माणसाने बनवला Ghibli फोटो

रोहित गोळे

07 Apr 2025 (अपडेटेड: 07 Apr 2025, 10:54 AM)

follow google news

मुंबई: सध्या इंटरनेटवर एक नवीन ट्रेंड जोरदार व्हायरल होत आहे, आणि त्याचे नाव आहे 'Ghibli ट्रेंड'. या ट्रेंडच्या केंद्रस्थानी आहे ग्रँट स्लॅटन नावाचा एक अवलिया, जो OpenAI कंपनीचा CEO आहे. ज्याने AI-जनरेटेड स्टुडिओ Ghibli स्टाइलमधील पोर्ट्रेट्स तयार करून जगभरातील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.  पण  Ghibli स्टाइलमधील पहिला फोटो नेमका कोणी अपलोड केला आणि त्याची एवढी चर्चा का सुरू झाली हे आपण आता जाणून घेऊया.

हे वाचलं का?

Ghibli ट्रेंडची सुरुवात

हा ट्रेंड सुरू झाला 26 मार्च 2025 रोजी, जेव्हा OpenAI ने त्यांचं नवं इमेज-जनरेशन फीचर लॉन्च केलं. या फीचरचा वापर करून सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या ग्रँट स्लॅटन याने आपल्या कुटुंबाचा - स्वतःचा आपल्या पत्नी आणि कुत्र्यासोबतचा - एक फोटो स्टुडिओ Ghibli स्टाइलमध्ये रूपांतरित केला.

हे ही वाचा>> Grok वर अगदी मोफत बनवा Ghibli फोटो, Step-by-Step जा अन् मस्त...

हा फोटो त्याने त्याच्या X अकाउंटवर शेअर केला आणि काही तासांतच तो व्हायरल झाला. या पोस्टला 46 लाखांहून व्ह्यूज मिळाले आणि OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमन यांचेही लक्ष वेधून घेतले. 

अमेरिकन AI कंपनी आणि ChatGPT मेकर OpenAI ने 26 मार्च रोजी त्यांचे नवीन इमेज मेकर टूल 4o ची घोषणा केली. यानंतर, सॉफ्टवेअर इंजिनियर स्लॅटनने या टूल्सचा वापर करून त्यांच्या कुटुंबाचा फोटो पुन्हा तयार केला. 

ग्रँट स्लॅटन कोण आहे?

ग्रँट स्लॅटन हा एक सॉफ्टवेअर अभियंता आहे जो AI आणि क्लाउड कम्प्युटिंग क्षेत्रात तज्ञ आहे. त्याने Amazon Web Service मध्ये सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर या पदावर काम केले आहे. सध्या, तो Row Zero च्या संस्थापक इंजिनिअर आहे, जिथे तो जगातील सर्वात वेगवान स्प्रेडशीट विकसित करण्यात योगदान देत आहेत. त्याने यापूर्वीही तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक नाविन्यपूर्ण कामे केली आहेत, पण या Ghibli ट्रेंडमुळे तो आता जगभरात प्रसिद्ध झाला आहे. 

स्लॅटनने स्टुडिओ Ghibli स्टाइलमधील पोर्ट्रेट्स तयार करण्यासाठी OpenAI च्या GPT-4o मॉडेलचा वापर केला. या मॉडेलद्वारे तो कोणत्याही फोटोला Ghibliच्या हाताने काढलेल्या अॅनिमेशनसारखे रूप देऊ शकतो. त्याच्या या पोस्टमुळे अनेकांनी आपले फोटो Ghibli स्टाइलमध्ये रूपांतरित करण्यास सुरुवात केली आणि हा ट्रेंड जगभर पसरला.

स्टुडिओ Ghibli आणि AI: एक वादग्रस्त चर्चा

1985 मध्ये हायाओ मियाझाकी आणि इसाओ ताकाहाता यांनी स्थापन केलेला स्टुडिओ Ghibli हा त्यांच्या हाताने काढलेल्या अॅनिमेशनसाठी आणि भावनिक कथानकांसाठी प्रसिद्ध आहे. पण AI च्या या नव्या ट्रेंडमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अनेक कलाकारांना वाटते की AI-जनरेटेड कला ही पारंपरिक कलेचा आत्मा हरवते.

हे ही वाचा>> व्हा सावध, होऊ नका सावज... Ghibli फोटो तयार करताना केली 'ही' चूक तर बँक अकाउंट होईल खाली!

दुसरीकडे, काहीजण या ट्रेंडला स्टुडिओ Ghibli च्या कलेचा उत्सव मानतात. पण स्टुडिओ Ghibli चे संस्थापक हायाओ मियाझाकी यांनी AI च्या वापराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, अॅनिमेशनमध्ये AI चा वापर पारंपरिक कलेच्या सौंदर्याला आणि भावनिक खोलीला हानी पोहोचवू शकतो.

भारतातही Ghibli ट्रेंडचा बोलबाला

OpenAI चे COO ब्रॅड लाइटकॅप यांनी नुकतेच सांगितले की, भारत हा ChatGPT साठी सर्वात वेगाने वाढणारा बाजार बनला आहे. Ghibli ट्रेंडच्या आगमनानंतर, 130 दशलक्ष युजर्सनी 700 दशलक्षांहून अधिक इमेजेस तयार केल्या आहेत, आणि यामध्ये भारतीय युजर्सचा मोठा वाटा आहे. ChatGPT चे सीईओ सॅम ऑल्टमन यांनीही भारतातील AI चा वाढता स्वीकार कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, हा ट्रेंड जितका मजेदार वाटतो तितकाच तो चिंताजनकही आहे. सायबरसुरक्षा तज्ज्ञांनी युजर्सना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. अनेक AI टूल्सच्या सेवा अटी अस्पष्ट असतात, ज्यामुळे युजर्सच्या फोटोंचा गैरवापर होण्याची शक्यता असते.

Ghibli स्टाइल इमेजेस कशा तयार करायच्या?

जर तुम्हालाही Ghibli स्टाइलमध्ये तुमचे फोटो रूपांतरित करायचे असतील, तर अनेक अॅप्स आणि प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. ChatGPT व्यतिरिक्त, तुम्ही खालील अॅप्सचा वापर करू शकता:

OpenAI चे GPT-4o मॉडेल: यामध्ये तुम्ही तुमचा फोटो अपलोड करून "Convert to Studio Ghibli style" असा प्रॉम्प्ट देऊ शकता.

इतर AI टूल्स: अनेक फ्री अॅप्स जसे की Artify, GhibliGen, आणि AnimeAI सुद्धा ही सुविधा देतात.

    follow whatsapp