Maratha Reservation : ‘…तर आंदोलनाचा मार्ग योग्यच’, जरांगेंच्या पदयात्रेवर CM शिंदे काय म्हणाले?

मुंबई तक

24 Jan 2024 (अपडेटेड: 24 Jan 2024, 01:06 PM)

गायकवाड आयोगाच्या अहवालावर सुप्रीम कोर्टाने निर्णय़ दिला आहे, आता आपण सुकरे आय़ोग नेमलेला आहे. त्यावर संपूर्ण टीम काम करतेय. सुप्रीम कोर्टाने ज्या त्रूटी दाखवल्या होत्या, त्या त्रुटी दुर करण्याचे काम हे आयोग करणार आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर हा अहवाल सरकारला सादर होईल

cm eknath shinde reaction on manoj jarange patil antarwali sarati to mumbai rally maharashtra politics

cm eknath shinde reaction on manoj jarange patil antarwali sarati to mumbai rally maharashtra politics

follow google news

Cm Eknath Shinde on Manoj jarange Patil : इम्तियाज मुजावर,सातारा :  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अंतरावली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार ही पदयात्रा आता पुण्यात धडकली आहे. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Pat)il आणि मराठा समाजाला आंदोलन टाळण्याचे आवाहन केले आहे. सरकार काम करत नसेल तर नक्कीच आंदोलन करा, पण सरकार सकारात्मक असताना आंदोलनाची गरज नाही, त्यामुळे आंदोलन टाळावे असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी केले आहे.(cm eknath shinde reaction on manoj jarange patil antarwali sarati to mumbai rally maharashtra politics)

हे वाचलं का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावच्या यात्रेसाठी दोन दिवसीय सातारा दौऱ्यावर आले आहेत.यावेळी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. गायकवाड आयोगाच्या अहवालावर सुप्रीम कोर्टाने निर्णय़ दिला आहे, आता आपण सुकरे आय़ोग नेमलेला आहे. त्यावर संपूर्ण टीम काम करतेय. सुप्रीम कोर्टाने ज्या त्रूटी दाखवल्या होत्या, त्या त्रुटी दुर करण्याचे काम हे आयोग करणार आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर हा अहवाल सरकारला सादर होईल.आणि एक विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाबद्दल निर्णय़ घेतला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा : Mamata Banerjee : ‘INDIA’ आघाडी फुटली! ममता बॅनर्जींनी सोडली साथ

क्युरेटिव्ह पिटीशनबाबतही सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. याबाबतीत एक विंडो तयार झाली आहे. सरकारला जो अधिकार दिला गेला आहे, त्या अधिकाराचा वापर करून, आपण या मराठा आरक्षणाचा देण्याचा निर्णय़ घेणार आहोत, असे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, हे आरक्षण टीकणार आणि कायद्याच्या चौकटीत बसणारच असणार असे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.

जरांगे पाटलांना मी कालही आवाहन केले आणि आजही त्यांना विनंती आहे. मराठा आरक्षणावर सरकार सकारात्मक आहे. आज ओबीसीप्रमाणे त्यांना सुविधा देतोय, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुविधा देतोय, होस्टेलने नसलेल्या ठिकाणी निर्वाह भत्ता देतोय.सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहे. कोणत्याही समाजावर अन्याय न करता आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कायद्याची चौकटीत आणि टीकणारच आरक्षण देणार आहोत.त्यामुळे सरकार काम करत नसेल तर नक्कीच आंदोलन करा, पण सरकार सकारात्मक आहे, त्यामुळे जरांगे पाटलांनी आंदोलन टाळलं पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.

    follow whatsapp