Narayan Rane: जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्यांनी (Shankaracharya) हिंदू धर्मासाठी काय योगदान दिले असा सवाल केला होता. त्यांच्या त्या वक्तव्यानंतर शंकराचार्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आजच ज्योतिष पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज (Swami Avimukteshwaranand Sarasvati Maharaj) यांनी त्यांच्यावर पलटवार करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सरस्वती महाराज यांनी नारायण राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. यामुळे राम मंदिराचे उद्घाटन होईपर्यंत हा वाद आणखी वाढणार असल्याचे चिन्हं दिसत आहे.
ADVERTISEMENT
राणेंची हकालपट्टी करा
मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्य यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, भाजपला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शंकराचार्च राजकीय दृष्टीकोनातून पाहत आहेत. मात्र हे जे राम मंदिर होते आहे ते काही राजकीय दृष्टीकोनातून होत नसून धार्मिक दृष्टीकोनातून होत आहे. राम हे आमचं दैवत असून त्यासाठीच त्याची उभारणी केली जात असले तरी या शंकराचार्यांनी त्यांच्या जीवनातील हिंदू धर्मासाठी काय योगदान दिले होते असा सवाल त्यांनी शंकराचार्यांनी केला होता. त्यावरूनच राजकारण तापले होते. त्यावरूनत सरस्वती महाराज यांनी आजच नारायण राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.
हे ही वाचा >> शरद पवारांचा वसुलीचा धंदा, 435 कोटी…, किरीट सोमय्यांनी सांगितलं प्रकरण
परंपरा शंकराचार्यांची
नारायण राणे यांच्या त्या विधानाचा खरपूस समाचार घेत जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी सांगितले की, आम्ही कुणावरही टीका केली नाही आणि त्याला विरोधही केला नाही. मात्र हजारो वर्षापासून देश गुलामी करत असतानाही सनातन धर्म टिकून आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, धर्माचे पालन हे शंभर वर्षांची संघटना किंवा 45 वर्षांचा पक्ष नाही तर गेल्या कित्येक वर्षापासून चालत आलेल्या शंकराचार्यांच्या परंपरेमुळे शक्य झाल्याचेही त्यांनी त्यांना ठणकावून सांगितले.
आमच्या जीवनाचे सूत्र
सरस्वती महाराज यांनी टीका करताना त्यांनी सांगितले की, ‘सर्वे भवंतु सुखिनः सर्वे संतु निरामया’ हेच आमच्या जीवनाचे सूत्र आहे. त्यामुळे आम्ही कुणाला शाप देत नाही तर आशिर्वादच देतो. कारण धर्मशास्त्राची जी बाजू आहे ती बाजू मांडणे हीच आमची जबाबदारी असून त्या जबाबदारीचे आम्ही पालन करत असल्याचे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
हीच आमची जबाबदारी
नारायण राणे शंकराचार्यांवर टीका करताना त्यांच्या योगदाना विषय काढला होता. त्यावरून शंकराचार्यांनी सांगितले की, सनातन धर्माच्या कुठल्याही पक्षात त्याची शास्त्रीय बाजू पाहणे, त्याची समीक्षा करणे आणि मार्गदर्शन करणे हीच आमची जबाबदारी असल्याचे सांगत त्याच जबाबदारीचे आम्ही पालन करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT