Maharashtra HSC Result: 2024 साली बारावीच्या निकालाचा ट्रेंड होता तरी कसा?

HSC Maharashtra Result 2025 : मार्च महिन्यात बारावीची परीक्षा पार पडल्यानं आता विद्यार्थ्यांसह पालकांना या परीक्षेच्या निकालाची उत्सुकता लागली आहे.

HSC Result 2025 Latest Update

HSC Result 2025 Latest Update

मुंबई तक

• 05:54 PM • 20 Apr 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत लागला सर्वात कमी निकाल

point

कोकण विभागात लागला सर्वात जास्त निकाल

point

जाणून घ्या निकालाची जिल्हानिहाय टक्केवारी

HSC Maharashtra Result 2025 : मार्च महिन्यात बारावीची परीक्षा पार पडल्यानं आता विद्यार्थ्यांसह पालकांना या परीक्षेच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. उत्तरपत्रिका तपासणीचे काम शेवटच्या टप्प्यात आलं आहे. अशातच बारावीचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. करिअरच्या दृष्टीकोनातून बारावीचा निकाल खूप महत्त्वाच असतो. कारण या निकालानंतर विद्यार्थी त्यांच्या करिअरच गोल सेट करतात. दरम्यान, मागील वर्षी बारावीच्या निकालाचा ट्रेंड कसा होता, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

हे वाचलं का?

गतवर्षी बारावीच्या निकालाचा ट्रेंड कसा होता? जाणून घ्या

मागील वर्षी 2024 मध्ये बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर करण्यात आला होता. राज्यात गेल्या वर्षी बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला होता. गतवर्षीच्या बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली होती. विशेष म्हणजे सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला होता. त्यामुळे यंदा बारावीचा निकाल किती टक्के लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

हे ही वाचा >> Anaya Bangar: 'क्रिकेटर्संनी न्यूड फोटो पाठवले अन्', लिंग बदल झालेल्या अनाया बांगरने सांगितलं हादरवून टाकणारं सत्य

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी निकालाच्या टक्केवारीबाबत सविस्तर माहिती दिली होती. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये बारावीच्या निकालाचा टक्का वाढला होता. राज्यामध्ये 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 यादरम्यान बारावीच्या परीक्षा पार पडल्या होत्या. 

कोकण विभागात 97.51 टक्के असा सर्वात जास्त निकाल लागला होता. तर पुणे 94.44 टक्के, नागपूर 92.12 टक्के, संभाजी नगर 94.08 टक्के, मुंबई 91.95  कोल्हापूर 94.24 टक्के, अमरावती 93 टक्के, नाशिक 94.71 टक्के, लातूरमध्ये 92.36 टक्के, असा निकाल लागला होता. 

हे ही वाचा >> 14 व्या वर्षीच IPL खेळला अन् पहिल्याच चेंडूत सिक्स; Google CEO ला चकित करणारा वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?

'अशी' असते ग्रेडिंग सिस्टम

75 टक्के आणि त्यापुढे – Distinction

60 टक्के आणि त्यापुढे – प्रथम श्रेणी (First Class)

45 टक्के to 59 टक्के – द्वितीय श्रेणी (Second Class)

35 टक्के to 44 टक्के – उत्तीर्ण श्रेणी (Pass Class)

35 टक्के पेक्षा कमी – अनुत्तीर्ण (Fail)

    follow whatsapp