‘मला त्याचे तुकडे करायचेत’, दर्शना पवारच्या आईचा ह्रदय पिळवटून टाकणारा टाहो!

दर्शनाच्या आईवडिलांना प्रचंड धक्का बसला असून, त्यांची अवस्था बघून बघणाऱ्यांचंही काळीज पिळवटून टाकत आहे. दर्शनाच्या हत्येप्रकरणी राहुलला अटक करण्यात आल्यानंतर तिच्या आईने टाहोच फोडला.

Darshan Pawar murder case : what said darshan pawar mother after arrest of rahul handore.

Darshan Pawar murder case : what said darshan pawar mother after arrest of rahul handore.

मुंबई तक

22 Jun 2023 (अपडेटेड: 22 Jun 2023, 09:13 AM)

follow google news

Darshana Pawar Murder Case : एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हत्या प्रकरणाने महाराष्ट्र सुन्न झाला आहे. राजगड पायथ्याशी असलेल्या सीतेचा माळ ठिकाणी दर्शनाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. दर्शना पवारच्या हत्येप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुल हंडोरे (रा. नाशिक) याला मुंबई उपनगरातील अंधेरीतून अटक केली. दुसरीकडे दर्शनाच्या आईवडिलांना प्रचंड धक्का बसला असून, त्यांची अवस्था बघून बघणाऱ्यांचंही काळीज पिळवटून टाकत आहे. दर्शनाच्या हत्येप्रकरणी राहुलला अटक करण्यात आल्यानंतर तिची आईने सुनंदा पवार यांनी टाहोच फोडला. “त्याला माझ्याकडे द्या. मला त्याचे तुकडे करायचे आहेत”, अशी मागणी करताना त्यांचा कंठ दाटून आला.

हे वाचलं का?

राजगड किल्ल्याच्या पायथ्याजवळ दर्शना पवाराचा मृतदेह सापडल्यामुळे तिच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. तिच्या आई आणि वडील या धक्क्याने सुन्न झाले आहेत. राहुलला अटक करण्यात आल्याची माहिती कळल्यानंतर तिच्या आईने दुःखाला वाट करून देत त्याचा जीव घ्यायचा म्हणत टाहो फोडला.

हेही वाचा >> Covid Centre scam : ठाकरेंच्या नेत्यांना अडचणीत आणणारं ‘हे’ प्रकरण काय?

राहुल हंडोरेला अटक, दर्शनाची आई म्हणाली…

“मला तिथे घेऊन जा, माझ्या मुलीचे जसे तुकडे झाले तसे मी त्याचे करणार आहे. मी एकटीच तुकडे करते त्याचे, मला कुणीच लागत नाही. जशी माझ्या मुलीची त्याने हत्या, तशीच मला त्याची हत्या करायची आहे. मलाच तिथं घेऊन जा फक्त. मला तिला न्याय द्यायचा आहे आणि तो मीच देऊ शकते”, अशी मागणी दर्शना पवारच्या आईने केली आहे.

अजून 50 मुली जायला नको

दर्शनाची आई म्हणाली, “त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अजून दहा मुलींचं पुढे नुकसान झालं नाही पाहिजे. माझी तर गेलेलीच आहे, पण अजून 50 मुली जायला नको. त्याला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, नाहीतर मलाच घेऊन जा तिथे.”

हेही वाचा >> Pune : MPSC पास दर्शना पवारला राहुल हंडोरेनेच संपवलं! हत्येचं कारण…

“जसे माझ्या मुलीचे तुकडे केले, तसेच मी त्याचे करणार आहे. त्यांच्यात काही नव्हतं. मैत्रीही नव्हती. ते अभ्यासावरच बोलायचे. त्याने तिला फसवून नेले आणि तिचा घात केला. त्याला फक्त माझ्या ताब्यात द्या. माझ्याकडे देणार नसाल, तर त्याला फाशीची शिक्षा द्या”, अशी मागणी दर्शनाच्या आईने सरकारकडे केली आहे.

त्याला मारून टाका; दर्शना पवारचा भाऊ काय म्हणाला?

दर्शनाचा भाऊ अभिषेक पवारनेही राहुल हंडोरेला मारून टाकण्याची मागणी केलीये. “आमच्या ताब्यात द्या नाहीतर त्याला मारून टाका. त्याला जिवंत सोडता कामा नये. त्याच्यामुळे माझ्या बहिणीला खूप मोठा त्रास झालेला आहे. तिच्यासोबत खूप मोठा घात झाला आहे. त्यामुळे तुम्ही मारा नाहीतर आमच्याकडे द्या, एवढीच सरकारला विनंती आहे”, अशी मागणी दर्शनाच्या भावाने केली.

    follow whatsapp