Lepto-hepatitis Death : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील काही भागात मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तर आज पुन्हा एकदा नायर हॉस्पिटलमध्ये 14 वर्षाच्या मुलाचा हिपॅटायटीस बी आणि लेप्टोने (hepatitis-Lepto) मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा आरोग्यचा प्रश्न गंभीर झाला आहे. हिपॅटायटीस बी आणि लेप्टोने मुलाचा मुंबईमध्ये ऑगस्टमहिन्यामध्ये पहिल्यांदाच मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
डेंग्यू-मलेरियाचा त्रास नव्हता
नायर रुग्णालयात 14 वर्षांच्या मुलाचा हिपॅटायटीस बी आणि लेप्टोने मृत्यू झाला आहे. या मुलाला 16 ऑगस्ट रोजी या मुलाला गंभीर अवस्थेत कस्तुरबा रुग्णालयातून नायर रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसांनी 18 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर या मुलाला डेंग्यू आणि मलेरियाचा त्रास नव्हता असं रुग्णालयाचे डीन डॉ. सुधीर मेढेकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
हे ही वाचा >> One Nation One Election वरून संजय राऊत संतापले; मोदींना म्हणाले, ‘फुगा…’
मुंबईत पहिला मृत्यू
या मुलाच्या मृत्यूनंतर आरोग्य विभागाने सांगितले की, मुंबईत ऑगस्ट महिन्यामध्ये लेप्टो आणि हिपॅटायटीसच्या रुग्णांमध्ये घट झाली होती. मात्र या वर्षी पहिल्यांदाच लेप्टो आणि हेपेटायटीस बी आजारामुळे शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आहे.
प्रकृती जास्त खालावली
कुर्ला पश्चिम येथील रहिवासी असलेल्या या मुलाला ताप आल्याने कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नायर रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयाचे डीन डॉ. सुधीर मेढेकर यांनी सांगितले की, रुग्णाला 16 ऑगस्ट रोजी दुपारी 3.42 वाजता नायर रुग्णालयाच्या अपघाती विभागात आणण्यात आले होते.
हे ही वाचा >> Murder Case : केंद्रीय मंत्र्याच्या घरात तरुणाची गोळी घालून हत्या, पिस्तुल केले जप्त
मलेरिया-डेंग्यू चाचणी निगेटिव्ह
यावेळी नायर येथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना तातडीने एनआयसीयूमध्ये दाखल केले. त्यावेळी रुग्णाची रक्त तपासणीही करण्यात आली. त्यानंतर मुलाची चाचणीही करण्यात आली, मात्र त्यामध्ये मलेरिया आणि डेंग्यू चाचणी निगेटिव्ह आली होती. तर त्याच वेळ त्याच्या दुसऱ्या चाचण्या केल्या नंतर त्याला लेप्टो आणि हिपॅटायटीस बी झाल्याचे निदान झाले होते.
यकृत खराब
त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले मात्र तपासणीनंतर डॉक्टरांना हेपेटायटीस बीमुळे रुग्णाचे यकृत खराब होत असल्याचे आढळून आले. त्यानुसार त्याच्या उपचार करण्यात आले मात्र 18 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता या मुलाचा उपचारादरम्यान म
ADVERTISEMENT