Ratnagiri Farmer : गेल्या कित्येक दिवसांपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांसह (Mango farmers) शेतकरी वर्ग वानर आणि माकडांच्या उपद्रवामुळे प्रचंड त्रस्त झाला आहे. वानर आणि माकडांमुळे (Apes and monkeys) शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. हातातोंडाशी आलेलं पिकांचे नुकसान होत असल्याने आता आम्हाला आत्महत्येशिवाय (Suicide) पर्याय नसल्याचे सांगत आत्महत्येची परवानगी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी अविनाश अनंत काळे (Avinash Anant Kale) या शेतकऱ्याच्या आंब्याच्या बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने एक तर वानरांचा बंदोबस्त करावा अन्यथा आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.(Farmer Avinash Anant Kale demands permission to commit suicide my family government is not taking care of monkeys)
ADVERTISEMENT
मुख्यमंत्र्यांनाही निवेदन
वानर, माकड यांच्या प्रचंड उपद्रवामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील शेतकरीवर्ग आणि आंबा बागायतदार यांचे जगणे मुश्किल झाले आहे. गेल्या वर्षभरापासून वानर, माकड यांचा बंदोबस्त सरकारने करावा यासाठी लाक्षणिक उपोषण केले होते. त्या उपोषणातून मुख्यमंत्र्यांपासून जिल्हाधिकारी, वन अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करून त्याची माहिती दिली होती. तरीही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
हे ही वाचा >> जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारली, पोलिसांनी बजावलेल्या ‘त्या’ नोटीसमध्ये काय?
शेतीचं प्रचंड नुकसान
गेल्या कित्येक दिवसांपासून वानर आणि माकडांपासून शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती, अन्यथा मला माझ्या कुटुंबीयांसह आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी अविनाश काळे यांनी केली आहे.
आर्थिक आणि मानसिक त्रास
वानर, माकडांपासून शेतीचा बंदोबस्त करावा नाही तर माझ्यासह कुटुंबाला आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करून सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे शेती बागायत करताना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक असा प्रचंड त्रास होतो आहे. तसेच शेती ही बागायतीवर अवलंबून असल्याने वानर, माकडांच्या त्रासामुळे जगणं कठीण झालं आहे, त्यामुळे कुटुंबासह मला आत्महत्या करण्याची परवानगी मिळावी म्हणजे माझी वानर आणि माकडांच्या त्रासापासून कायमची मुक्ती मिळेल अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT