व्हा सावध, होऊ नका सावज... Ghibli फोटो तयार करताना केली 'ही' चूक तर बँक अकाउंट होईल खाली!

Ghibli फोटो तयार करण्यासाठी लोकांमध्ये जी स्पर्धा सुरू आहे. त्याच घाईचा फायदा घेऊन काही घोटाळेबाज तुम्हाला ऑनलाइन फसविण्याची दाट शक्यता आहे.

Ghibli फोटो तयार करतान केली 'ही' चूक तर बँक अकाउंट होईल खाली!

Ghibli फोटो तयार करतान केली 'ही' चूक तर बँक अकाउंट होईल खाली!

मुंबई तक

02 Apr 2025 (अपडेटेड: 02 Apr 2025, 10:08 PM)

follow google news

मुंबई: Ghibli इमेज तयार करण्याचा ट्रेंड वेगाने वाढला आहे. प्रत्येकजण त्यांच्या फोनवर किंवा सोशल मीडियावर Ghibli फोटो  शेअर करत आहे. हा ट्रेंड इतका वेगाने वाढला आहे की Ghibli फोटो तयार करणारे AI टूल्स देखील थकत आहेत.   Ai टूल्सला फोटो  बनविण्याची कमांड दिल्यानंतर फोटो तयार होण्यासाठी बराच वेळ घेत आहे. पण याच दरम्यान, ऑनलाइन गंडा घालणारे हे यामध्ये एंट्री करत असल्याचं समोर आलं आहे.

हे वाचलं का?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोकं हे Ghibli फोटो तयार करण्यासाठी जी घाई करत आहेत त्याचाच फायदा हा घोटाळेबाज घेत आहेत. अशी लोकं बनावट AI वेबसाइट तयार करू शकतात आणि Ghibli फोटो तयार करण्याचा दावा करू शकतात. ते तुमची माहिती चोरून तुमची फसवणूक देखील करू शकतात. अशा परिस्थितीत, Ghibli फोटो तयार करताना, घाई करण्याऐवजी काळजी घ्यावी लागेल.

हे ही वाचा>> Grok वर अगदी मोफत बनवा Ghibli फोटो, Step-by-Step जा अन् मस्त...

फेस डिटेल्सही होत आहेत वेगाने लीक

जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, लोकं त्यांचे फेस डिटेल्स देखील काहीही विचार न करता शेअर करत आहेत. जे त्यांनी आपल्या UPI आणि नेट बँकिंग अॅप्सवर लॉक-अनलॉकसाठी ठेवलं आहे. तज्ञांच्या मते, हे देखील धोकादायक ठरू शकतं.

असं बनवा Ghibli फोटो

AI-जनरेटेड Ghibli-Style फोटोंना गिब्लिफिकेशन असेही म्हटले जात आहे. लोक त्यांचे फोटो स्टुडिओ Ghibli स्टाईलमध्ये रूपांतरित करत आहेत आणि सोशल मीडियावर शेअर करत आहेत. ChatGPT (OpenAI) ने यूजर्संना इमेज जनरेशन फीचरद्वारे फोटो स्टुडिओ Ghibli थीममध्ये रूपांतरित करण्याची सुविधा दिली आहे. परंतु त्यावर मर्यादा देखील लादल्या आहेत. पूर्वी, चॅटजीपीटी सहजपणे AI फोटो बनवून देत होतं. परंतु Ghibli फोटो तयार करण्याच्या स्पर्धेमुळे त्यावर जवळजवळ निर्बंध आले आहेत.

हे ही वाचा>> ChatGpt Sam Altman: Ghibli फोटो आता मिळणार Free, कोणी केली एवढी मोठी घोषणा?

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, OpenAI ने  ChatGPT प्लस, प्रो आणि टीम यूजर्संसाठी इमेज जनरेशन फीचर लाँच केल्यानंतर, सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड सुरू झाला. यामध्ये, लोकांनी त्यांचे खरे फोटो जपानच्या प्रसिद्ध स्टुडिओ Ghibli च्या अॅनिमेशन स्टाइलमध्ये बदलण्यास सुरुवात केली.

गिब्ली की घिब्ली... कोणता उच्चार बरोबर?

आता प्रश्न असा आहे की Ghibli इमेज काय आहे. त्याचा योग्य उच्चार गिब्ली आहे घिब्ली? पण याबाबत अद्याप कोणतंही ठोस उत्तर मिळू शकलेलं नाही. कारण लोकं याचा त्यांच्या सोयीनुसार उच्चार करत आहेत.

    follow whatsapp