Ganesh Chaturthi 2024: बाप्पाच पावला! गणेशोत्सवानिमित्त मिळणार एवढ्या सुट्ट्या... 

रोहिणी ठोंबरे

02 Sep 2024 (अपडेटेड: 02 Sep 2024, 06:23 PM)

ganesh chaturhti 2024 holidays : सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्यात पदार्पण केल्यानंतर आता सर्वांना आतुरता फक्त गणपती बाप्पाच्या आगमनाची आहे. घरोघरी बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे.

point

आता सर्वांना आतुरता फक्त गणपती बाप्पाच्या आगमनाची आहे.

point

गणेशोत्सवाच्या सुट्ट्या किती दिवस आणि कोणाला मिळणार जाणून घेऊया...

ganesh chaturhti 2024 holidays : सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्यात पदार्पण केल्यानंतर आता सर्वांना आतुरता फक्त गणपती बाप्पाच्या आगमनाची आहे. घरोघरी बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. अशावेळी बाप्पासोबत सुट्ट्या मिळणार याचाही अनेकांना आनंद आहे. चला तर मग गणेशोत्सवाच्या सुट्ट्या किती दिवस आणि कोणाला मिळणार जाणून घेऊया... (ganesh chaturhti 2024 holidays on ganesh chaturthi day

हे वाचलं का?

देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळणार आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये बँकांना सुट्ट्या असतील, याशिवाय इतर काही राज्यांमध्येही सप्टेंबर महिन्यातील सणसमारंभानिमित्त बँका बंद असणार आहेत. 

हेही वाचा : Ladki Bahin Yojana : 31 ऑगस्ट शेवटची तारीख नाही! सरकार अर्ज करण्यासाठी देणार मुदतवाढ?

यंदा गणपती बाप्पाचं आगमन शनिवारी 7 सप्टेंबरला होत आहे त्यामुळे त्यादिवशी अनेक ऑफिस, शाळा-कॉलेज आणि बँका बंद राहतील. शालेय मुलांना तर नेहमीप्रमाणे 5 दिवस सुट्टी  असतील.

सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील बँका किती दिवस राहणार बंद?

1 सप्टेंबर 2024 – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

7 सप्टेंबर 2024 - गणेश चतुर्थीनिमित्त महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बँका बंद राहतील.

8 सप्टेंबर 2024 – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

14 सप्टेंबर 2024– दुसरा शनिवार

15 सप्टेंबर 2024– रविवार

16 सप्टेंबर 2024 – ईद-ए-मिलादनिमित्त अनेक राज्यांमध्ये सुट्टी असेल.

22 सप्टेंबर 2024– रविवार (साप्ताहिक सुट्टी)

28 सप्टेंबर 2024– चौथा शनिवार

    follow whatsapp