Maharashtra Weather: रविवारची सुट्टी जाणार वाया? राज्यात कसा असेल पावसाचा जोर? IMD चा अंदाज

रोहिणी ठोंबरे

15 Sep 2024 (अपडेटेड: 15 Sep 2024, 05:31 PM)

Mumbai Weather Forecast Today : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. आज रविवारी (15 सप्टेंबर) हवामान विभागाकडून राज्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.

point

15 सप्टेंबरनंतर म्हणजे आजपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार

point

मुंबईकरांची रविवारची सकाळच पावसाने सुरू झाली

Mumbai Weather Forecast Today : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. आज रविवारी (15 सप्टेंबर) हवामान विभागाकडून राज्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशावेळी रविवारची सुट्टी वाया जाणार की काय? याचं टेन्शन अनेकांना आलेलं आहे. त्यामुळे तुमच्या शहरात पावसाचा जोर कसा असेल? याविषयी हवामान विभागाचा अंदाज जाणून घेऊयात. (maharashtra Weather Forecast mumbai pune rain live update news today 15 September 2024 Know the status of your state)

हे वाचलं का?

15 सप्टेंबरनंतर म्हणजे आजपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. हळूहळू पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये वातावरण काहीसं ढगाळ असेल आणि अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. गेले काही दिवस मुंबईत पावसाची हीच स्थिती आहे. परंतु आज मात्र मुंबईकरांची रविवारची सकाळच पावसाने झाली. आज कमाल तापमान 32°C आणि किमान तापमान 26°C असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Horoscope In Marathi: 'या' राशीच्या व्यक्तींचं भाग्य उजळणार! पण काही लोकांच्या अडचणी वाढणार


कुठे मुसळधार तर कुठे संततधार... तुमच्या शहरात परिस्थिती काय?

हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील लोकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असे आवाहन हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

तसंच, पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. शहर आणि उपनगरात वातावरण अंशतः ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता आहे.कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32°C आणि 26°C च्या आसपास असेल.

हेही वाचा : Mukhyamantri Yojanadoot: 'लाडकी बहीण'नंतर 'यांना' मिळणार महिन्याला 10 हजार, नेमकी योजना काय?

 

पुणे शहर परिसरात आभाळ ढगाळ असेल, अधूनमधून हलका पाऊस पडू शकतो. तर, घाट विभागातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पुण्याचे तापमान आज 27°C कमाल आणि 20°C किमान इतके असू शकते.

विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 2 दिवस पावसाचा जोर वाढू शकतो. नागपूरचं तापमान आज 30°C कमाल आणि 21°C किमान असण्याचा अंदाज आहे.

    follow whatsapp