Mumbai Hit And Run : भरधाव कारची दोन दुचाकींना धडक, एकाचा मृत्यू, दोन जण जखमी, अपघात कसा घडला?

मुंबई तक

15 Sep 2024 (अपडेटेड: 15 Sep 2024, 03:44 PM)

Mumbai Hit And Run Latest News : मुंबईच्या दहिसर पूर्व भागातील हिट अँड रन प्रकरण समोर आलं आहे. वेगवान कारने दोन दुचाकींना धडक दिल्यानं मोठा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर कारचालक फरार झाला.

Mumbai Hit And Run Case

Mumbai Dahisar Accident News

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत पुन्हा घडलं हिट अँड रन प्रकरण

point

कार चालकाच्या त्या चुकीमुळं घडला मोठा अपघात

point

फरार चालकाला शोधण्यासाठी पोलिसांनी राबवली मोहीम

Mumbai Hit And Run Latest News : मुंबईच्या दहिसर पूर्व भागातील हिट अँड रन प्रकरण समोर आलं आहे. वेगवान कारने दोन दुचाकींना धडक दिल्यानं मोठा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर कारचालक फरार झाला. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोन लोक जखमी झाले आहेत. आदित्य वेलणकर असं मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. तर करण राजपूत आणि पीयुष शुक्ला अशी जखमींची नावं आहेत. 

हे वाचलं का?

याप्रकरणी दहिसर पोलिसांनी कलम 106(1),125(A),125(B),281 आणि मोटर वाहन अधिनियम कायद्यानुसार आरोपी चालकाविरोधात गुन्हा दाखल  केला आहे. पोलीस फरार कार चालकाचा शोध लावण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.  आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी एक अभियान सुरु केलं आहे. परंतु, अजूनही कार चालकाचा पत्ता लागला नाही. 

हे ही वाचा >> Ulhasnagar Crime: अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या शिक्षकाला ठोकल्या बेड्या, उल्हासनगरमध्ये काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, 13 सप्टेंबरला सायंकाळी 4 वाजता हा अपघात घडल्याचं समजते. या दिवशी करण राजपूत त्याचे मित्र आदित्य वेलणकर आणि पीयूष शुक्लासोबत दहीसरला गेले होते. शुक्ला दुचाकीवर होता. तर आदित्या आणि करण दुसऱ्या दुचाकीवर होते. आदित्य दुचाकीवर मागच्या बाजूला बसला होता.

हे सर्व जण दहिसरच्या शेलेन्द्र शाळेतून परत येत होते, त्यावेळी पश्चिम द्रुतगती मार्गावरून बोरीवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून एक कारचालक वेगानं प्रवास करत होता. चालकाने कारचा वेग वाढवून दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी कारचालकाने दुचाकीला टक्कर दिली. त्यानंतर पीयुष आणि करण जखमी आदित्यला रुग्णालयात घेऊन गेले. पण डॉक्टरांनी आदित्यला मृत घोषित केलं.

    follow whatsapp