Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थीचा उपवास कसा आणि कधी सोडला जातो? 'ही' आहे योग्य पद्धत...

रोहिणी ठोंबरे

29 Aug 2024 (अपडेटेड: 29 Aug 2024, 05:33 PM)

How And When To Break Ganesh Chaturthi Fast : आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी हा सण देशभरात साजरा केला जातो. या दिवशी गणपतीची पूजा करून त्याची मूर्ती 10 दिवस घरात ठेवण्याची प्रथा आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

गणेश चतुर्थीच्या उपवासासंबंधित काही नियम

point

गणेश चतुर्थीचा उपवास कधी सोडला जातो?

point

गणेश चतुर्थीचा उपवास कसा सोडला जातो?

How And When To Break Ganesh Chaturthi Fast : आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी हा सण देशभरात साजरा केला जातो. या दिवशी गणपतीची पूजा करून त्याची मूर्ती 10 दिवस घरात ठेवण्याची प्रथा आहे. त्यानंतर 11व्या दिवशी मूर्ती विसर्जित केली जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशीही अनेकजण उपवास करतात. परंतु आपल्यापैकी बहुतेकांना हा उपवास कसा करायचा आणि कधी सोडायचा याबद्दल योग्य माहिती नाही आहे. याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेऊयात. (Ganesh Chaturthi 2024 Fasting Guidelines Eating Dos & Don'ts)

हे वाचलं का?

गणेश चतुर्थीच्या उपवासासंबंधित काही नियम

गणेश चतुर्थीच्या उपवासासंबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. चतुर्थीच्या उपवासामध्ये गणपतीच्या मूर्तीची पूजा करण्यासोबतच शमीच्या झाडाचीही पूजा करावी लागते. यामुळे गरिबी, संकटे दूर होतात.

हेही वाचा : Ladki Bahin Yojana Aadhar Link: पैसे मिळाले नाही तर करा 'या' गोष्टी, लगेच मिळतील 3000 रु.

गणपतीची पूजा करताना सर्वप्रथम त्याला कुंकू लावा. त्यानंतर हे कुंकू स्वत:च्या कपाळावरही लावा. यामुळे तुम्हाला आरोग्य लाभेल आणि पूजेच्या वेळी तुम्ही फक्त लाल वस्त्र आणि लाल चंदनाचा वापर करावा. यामुळे संपत्ती वाढते. भगवान गणेशाला मोदक आवडतात, म्हणून तुम्ही पूजेनंतर त्यांना मोदक अर्पण केले पाहिजेत.

पूजेच्या वेळी गणपतीच्या पोटावर 11 दुर्वा चिकटवाव्यात. त्यानंतर संकटनाशन गणेश स्तोत्राचे पठण करावे. यासोबतच 'ओम गं गणपतये नमः' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील.

गणेश चतुर्थीचा उपवास कसा सोडला जातो?

गणेश चतुर्थीच्या उपवासादिवशी सकाळी उठून प्रथम स्नान करावे. त्यानंतर ध्यान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे. हातात तांदूळ आणि पाणी घेऊन उपवासाचा संकल्प करा. त्यानंतर गृहमंदिरात पूजा करून एका पाटावर लाल कपडा पसरवून त्यावर गणेशाची मूर्ती स्थापित करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही गणपतीचे चित्रही ठेवू शकता. नंतर गंगाजल शिंपडा आणि देशी तुपाचा दिवा लावा. गणपतीला मोदक किंवा लाडू अर्पण करा.

हेही वाचा : Viral Video: महिलेला खांद्यावर घेऊन धावतच सुटली...', महिला पोलिसाचा 'तो' Video नेमका काय?

या उपवासामध्ये चंद्राच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे, संध्याकाळी चंद्र पाहिल्यानंतरच हा उपवास सोडता येतो. चंद्रोदयानंतर पूजा करून तुम्ही तुमचा उपवास संपवू शकता. अनेकजण तांदळाची खीर खाऊन उपवास सोडतात, तर काहीजण फराळी पदार्थाने उपवास सोडतात.

    follow whatsapp