Ganesh Chaturthi 2024: घरी गणपती बसवताय? 'या' गोष्टी पाळाल तर बाप्पाचा मिळेल विशेष आशीर्वाद

रोहिणी ठोंबरे

• 06:35 PM • 07 Sep 2024

Ganesh Chaturthi : हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात अनेक मोठे सण साजरे केले जातात, ज्यामध्ये गणेश चतुर्थीच्या सणाला विशेष महत्त्व आहे

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याला विशेष महत्त्व आहे.

point

गणेश चतुर्थी यंदा ७ सप्टेंबर रोजी साजरी होत आहे.

point

यामुळे बाप्पाचा आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी राहील. 

Ganesh Chaturthi 2024 : हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात अनेक मोठे सण साजरे केले जातात, ज्यामध्ये गणेश चतुर्थीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी होणारी गणेश चतुर्थी यंदा ७ सप्टेंबर रोजी साजरी होत आहे. या दिवशी लोक आपल्या घरी गणपतीची मूर्ती स्थापित करून पूजा करतात. हा गणेश उत्सव भक्तांद्वारे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. (Ganesh Chaturthi 2024 how to bring luck at your home on ganesh chaturthi)

हे वाचलं का?

तुम्हीही तुमच्या घरात पहिल्यांदाच गणपतीची प्रतिष्ठापना करत असाल तर ही योग्य पद्धत पाळा. यामुळे बाप्पाचा आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी राहील. 

हेही वाचा : Mumbai Hit and Run : BMW कारने दोन गणेशभक्तांना उडवलं, हिट अँड रनने मुंबई पुन्हा हादरली!

बाप्पाच्या मूर्तीची निवड : गणेश चतुर्थीसाठी बाप्पाची मूर्ती निवडताना सोंड डावीकडे झुकलेली असावी. या प्रकारची मूर्ती घरी आणणे खूप शुभ मानले जाते. याशिवाय बसलेली गणेशमूर्ती आणणे हे सुख-समृद्धीचे प्रतीक आहे.

मूर्तीचे स्वरूप : गणेशमूर्ती खरेदी करताना मूर्तीचा एक हात आशीर्वाद मुद्रेत आहे आणि दुसऱ्या हातात मोदक आहे याची खात्री करा.

स्थापनेची दिशा: श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करताना मूर्ती ईशान कोनात (ईशान्य दिशा) ठेवावी आणि मूर्तीचे तोंड उत्तर दिशेला असावे. त्यासाठी स्वच्छ मचाण निवडून त्यावर कापड पसरून मूर्तीची प्रतिष्ठापना करावी.

हेही वाचा : Khuni Ganpati : धुळ्यातील मानाच्या गणरायाला 'खुनी गणपती' नाव कसं पडलं? काय आहे इतिहास?

पूजेची पद्धत : गणेशमूर्तीची स्थापना केल्यानंतर शुद्ध गंगाजल शिंपडावे आणि मूर्तीवर अक्षता अर्पण करावे. भगवान गणेशासोबत रिद्धी आणि सिद्धीची स्थापना करायला विसरू नका. मूर्तीच्या उजव्या बाजूला पाण्याने भरलेला कलश ठेवावा. त्यानंतर हातात फुले व अक्षता घेऊन गणेशाची पूजा करावी.

नैवेद्य आणि पूजा : पूजेदरम्यान श्रीगणेशाला फळे, फुले आणि मोदक अर्पण करा. गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात, म्हणून मोदकांचा नैवेद्यात नक्कीच समावेश करा. शेवटी, गणेशाच्या मंत्राचा जप करा आणि नंतर आरती करून पूजा पूर्ण करा.

गणेश चतुर्थीनिमित्त श्रीगणेशाची विधिपूर्वक स्थापना व पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते.
 

    follow whatsapp