Anant Chaturdashi Puja: अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं. अत्यंत जड अंतकरणाने भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात आणि पुढच्या वर्षी लवकर ये! अशी आर्त सादही घालतात. पण आजच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला बाप्पाची उत्तरपूजा केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. (ganesh visarjan 2024 do uttar puja on anant chaturdashi ganpati bappa will fulfill your wishes)
ADVERTISEMENT
जाणून घ्या अनंत चतुर्दशीला कशी करावी बाप्पाची उत्तरपूजा
उत्तरपूजा
स्नान करून गणपती बाप्पाच्या पुजेसाठी तयार व्हावे. सुरुवातीला कपाळाला कुंकू लावावे आणि आसनावर बसावे. त्यानंतर संकल्प करावा.
'श्री सिद्धिविनायकप्रीत्यर्थ पंचोपचारैः उत्तरपूजनं करिष्ये' असे म्हणून पंचोपचारांनी पूजा करावी.
श्री सिद्धिविनायकाय नमः । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ।
(बाप्पाच्या मूर्तीला गंध लावावे)
श्री सिद्धिविनायकाय नमः । पुष्पाणी समर्पयामि ।
(बाप्पाच्या मूर्तीला फुले वाहावीत)
हे ही वाचा>> Ganpati Visarjan Live : टाळ, मृदुंगाच्या गजरात लालबाग दुमदुमलं! 'लालबागचा राजा' कुठे पोहोचला?
श्री सिद्धिविनायकाय नमः । धूपं समर्पयामि ।
(बाप्पाच्या मूर्तीला उदबत्ती ओवाळावी.)
श्री सिद्धिविनायकाय नमः । दीपं समर्पयामि ।
(बाप्पाच्या मूर्तीला नीरांजन ओवाळावी.)
श्री सिद्धिविनायकाय नमः । नैवेद्यं समर्पयामि ।
(बाप्पाच्या मूर्तीला नैवेद्य दाखवावा. )
हे ही वाचा>> Gold Rate: बाप्पाचीच कृपा! आज सोन्याचे भाव चक्क घसरले... 24 कॅरेट सोन्याची किंमत माहितीये का?
विडा, दक्षिणा ठेवावी. नारळ फोडावा. सर्व मंडळीच्या कल्याणासाठी मागणे करावे, म्हणावे-
यांतु देवगणाः सर्वे पुजामादाय पार्थिवीम् । इष्टकामप्रसिद्धयर्थ पुनरागमनायच ॥
या मंत्राने मूर्तीवर 'मंगलमूर्ती मोरया' या नामघोषाने अक्षता वाहाव्या.
अनेन उत्तरपूजनेन श्री सिद्धिविनायकः प्रीयताम् । म्हणून उदक सोडावे.
नंतर बाप्पाची आरती करावी. मंत्रपुष्पांजली म्हणून सर्वांनी गणपतीवर गंधपुष्प वहावे. नमस्कार करावा. विसर्जनाच्या अक्षता घालाव्या. मूर्ती जरा हलवावी आणि मूर्तीचे विसर्जन वाजतगाजत सर्वांनी मिळून करावे.
गणपतीच्या जयजयकार करावा, म्हणावे- मंगलमूर्ती मोरया ! गणपती बाप्पा मोरया ! पुढच्या वर्षी लवकर या !
टीप: ही माहिती मान्यतांवर आधारित आहे. मुंबई Tak याच्याशी सहमत असेलच असे नाही.
ADVERTISEMENT