Anant Chaturthi 2024: 'या' शुभ मुहूर्तावर करा बाप्पाचं विसर्जन! जाणून घ्या योग्य पूजा-विधी

रोहिणी ठोंबरे

17 Sep 2024 (अपडेटेड: 17 Sep 2024, 01:36 PM)

Ganesh Visarjan Muhurta 2024 : भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला म्हणजेच 07 सप्टेंबर 2024 रोजी गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन झालं. त्यानंतर भाद्रपद शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच आज 17 सप्टेंबर 2024 रोजी लाडक्या बाप्पाचं विसर्जन होईल.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

गणपती विसर्जन शुभ मुहूर्त

point

गणेश विसर्जन मंत्र

point

गणेश विसर्जनाची योग्य पद्धत

Ganesh Visarjan Muhurta 2024 : भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला म्हणजेच 07 सप्टेंबर 2024 रोजी गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन झालं. त्यानंतर भाद्रपद शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच आज 17 सप्टेंबर 2024 रोजी लाडक्या बाप्पाचं विसर्जन होईल. यालाच अनंत चतुर्थी असंही म्हणतात. चला मग बाप्पाच्या विसर्जनाचा शुभ मुहूर्त आणि योग्य पूजा-विधी जाणून घेऊयात. (Anant Chaturthi ganesh visarjan 2024 visarjan Shubh muhurata puja vidhi)

हे वाचलं का?

हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला जितके महत्तव आहे तितकेच महत्त्व अनंत चतुर्दशीलाही आहे. गणेशोत्सवाच्या 10 दिवसांत श्रीगणेशाची आराधना केल्याने माणसाचे सर्व दु:ख दूर होतात, असा समज आहे. गणपती विसर्जन गणेश चतुर्थीच्या दहाव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला केले जाते. या दिवशी बाप्पा आपल्या घरी परत जातात.

हेही वाचा : Ganesh Visarjan 2024: बाप्पाच्या विसर्जनापूर्वी 'या' राशीच्या लोकांनी करा विशेष पूजा! सर्व विघ्न होतील दूर

गणपती विसर्जन शुभ मुहूर्त

  • सकाळचा मुहूर्त- सकाळी 09 वाडू 11 मिनिटे ते दुपारी 01 वाजून 47 मिनिटांपर्यंत
  • दुपारचा मुहूर्त- दुपारी 03 वाजून 19 मिनिटे ते 04 वाजून 51 मिनिटांपर्यंत 
  • संध्याकाळचा मुहूर्त- संध्याकाळी 07 वाजून 51 मिनिटे ते रात्री 09 वाजून 19 मिनिटांपर्यंत
  • रात्रीचा मुहूर्त- रात्री 10 वाजून 47 मिनिटे ते 18 सप्टेंबर रोजी पहाटे 03 वाजून 12 मिनिटांपर्यंत

श्री गणेश विसर्जन मंत्र 1

यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्।
इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥

श्री गणेश विसर्जन मंत्र 2

गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर।
मम पूजा गृहीत्मेवां पुनरागमनाय च॥

    follow whatsapp