Gold Rate: बाप्पाचीच कृपा! आज सोन्याचे भाव चक्क घसरले... 24 कॅरेट सोन्याची किंमत माहितीये का?

रोहिणी ठोंबरे

• 02:46 PM • 17 Sep 2024

Gold-Silver Price Today : आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी सोन्याचे भाव घसरले आहेत. गणरायाचा विसर्जन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होत असून बाप्पाने जाता जाता कृपाच केली असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

अनंत चतुर्दशीच्या दिवशी सोन्याचे भाव घसरले

point

आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती

point

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

Gold-Silver Price Today : आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी सोन्याचे भाव घसरले आहेत. गणरायाचा विसर्जन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होत असून बाप्पाने जाता जाता कृपाच केली असं म्हणणं वावगं ठरणार नाही. सोने आणि चांदीने गेल्या आठवड्यापासून तुफान बॅटिंग केली. अशावेळी तुम्ही दागीने घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही खास बातमी आहे. देशात सोन्याचा भाव 72,000 रुपयांहून अधिक आहे. शनिवार 7 सप्टेंबरपासून गणेश चतुर्थीच्या सणानिमित्ताने सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र आज अनंत चतुर्दशीला (17 सप्टेंबर) थोडं का होईना सोनं स्वस्त झालं आहे. त्यामुळे आजचे भाव जाणून घेऊया. (gold-silver prices on 17 september 2024 ganpati visarjan in maharashtra mumbai know the details)

हे वाचलं का?

Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवारी (16 सप्टेंबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 75,050 रूपये होता. आज यामध्ये 160 रूपयांनी घट झाली असून 74, 890 रूपये किंमत झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 150 रूपयांनी घसरला असून 68,650 रूपये किंमत झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत हजार रूपयांनी घटली असून 92,000 रूपये किंमत झाली. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.

हेही वाचा : Delhi New CM Net Worth: ना घर, ना जमीन... तरीही करोडपती आहेत दिल्लीच्या नव्या CM अतिशी

आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी 50 टक्क्यांनी वाढली आहे. आता लग्नासाठी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते सणासुदीच्या काळात सोन्याचा दर 76,000 रुपयांच्या पुढे जाऊ शकतो.

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

मुंबई

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,650 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,890 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 56,170 रूपये आहे.

पुणे

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,650 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,890 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 56,170 रूपये आहे.


नागपूर

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,650 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,890 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 56,170 रूपये आहे.

नाशिक

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,680 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,920 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 56,200 रूपये आहे.


22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

हेही वाचा : Anant Chaturthi 2024: 'या' शुभ मुहूर्तावर करा बाप्पाचं विसर्जन! जाणून घ्या योग्य पूजा-विधी


22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.

    follow whatsapp