Viral Video : ओढणी हातात घेऊन रिल बनवत होती, पाय घसरला अन् दरीत पडली, घटनेचा थरार पाहा जसाच्या तसा

मुंबई तक

• 04:52 PM • 17 Sep 2024

Girl Falls In Valley Viral Video : इन्स्टाग्रामवर रिल बनवताना तरुणीचा अचानक पाय घसरतो आणि ती खोल दरीत पडते, त्यानंतर जे घडतं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. 

Reel Star Girl Falls In Valley Video Viral

Young Girl Shockin Video Viral

follow google news

बातम्या हायलाइट

point

ओढणी हाताता घेऊन नाचणाऱ्या तरुणीचं होत्याचं नव्हतं झालं

point

रिल स्टार तरुणी दरीत पडल्यानंतर काय घडलं?

point

तरुणी दरीत पडलेला थरारक व्हिडीओ पाहून अंगावर काटाच येईल

Girl Falls In Valley Viral Video :  रायगडच्या माणगाव येथील कुंभे धबधब्यावर रिल स्टार तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. तरुणी रिल बनवण्याच्या नादात 300 फूट खोल दरीत पडली होती. ही घटना ताजी असतानाच आता अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर रिल बनवताना तरुणीचा अचानक पाय घसरतो आणि ती खोल दरीत पडते, त्यानंतर जे घडतं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. 

हे वाचलं का?

@palampursamachar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तरुणीचा हा भयानक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी खोल दरीत असलेल्या मोठ्या दगडावर उभी राहते आणि ओढणी हातात घेऊन नाचण्याचा प्रयत्न करते. त्याचवेळी दरीच्या विरुद्ध दिशेला असलेले लोक तरुणीचा व्हिडीओ कॅमेरात कैद करतात.

इथे पाहा तरुणीचा थरकाप उडवणारा व्हिडीओ

हे ही वाचा >> Viral Video: गणपतीच्या सोंडेजवळ अचानक आला जिवंत साप अन् पुढे जे घडलं...

तरुणी ओढणी घेऊन नाचण्याचा प्रयत्न करत असताना अचानक तिचा पाय घसरसो आणि ती दरीत पडते. त्यानंतर ती तरुणी कोलांट्या उड्या घेतल्याप्रमाणे खोल दरीत जाते. हा जीवघेणा थरार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास दोन लाख व्यूज मिळाले आहेत. तर 5 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी या व्हिडीओला प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. 

रिल बनवून सोशल मीडियावर प्रकाशझोतात येण्याच्या नादात अनेक जण आपला जीव धोक्यात घालत असतात. अशाच प्रकारचा धक्कादायक प्रकार या तरुणीसोबत घडला आहे. ही घटना नेमकी कुठे घडली आहे, याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आली नाहीय. अशाप्रकारचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी संतापजनक प्रतिक्रिया देतात. कुणीही रिल बनवण्याच्या नादात आपला जीव धोक्यात टाकू नका, असा सल्लाही अनेकजण देत असतात. 

    follow whatsapp