Gold Rate Today 25 Oct 2024 in your city: सणासुदीच्या दिवसात सोन्याला प्रचंड झळाळी आली आहे. यावेळी सोन्याने नवा उच्चांक गाठला. अशा परिस्थिती आता दिवाळीचा सण काही दिवसांवर आलेला असताना सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय. चला तर मग आजच्या (25 ऑक्टोबर 2024) सोने-चांदीच्या किंमतीतील बदल सविस्तर जाणून घेऊयात. (Gold-Silver price hike before diwali festival what are the rates of 24 22 and 18 carat gold today 25 october 2024 mumbai pune)
ADVERTISEMENT
भारतात सोने-चांदीच्या किंमती गगनाला भिडलेल्या पाहायला मिळत आहेत. पण आज थोडं का होईना यामध्ये बदल झाला आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.
हेही वाचा : Sudhir Salvi Shivadi : मुंबईतल्या बड्या नेत्याला उमेदवारी नाही, ठाकरेंना शिवडी विधानसभा जड जाणार?
Goodreturns वेबसाईटनुसार, गुरूवारी (24 ऑक्टोबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 79,470 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 110 रूपयांनी वाढ झाली असून याची किंमत 79,580 रूपये झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 72,850 रूपये होता. त्यातही 100 रूपयांनी वाढ झाली असून त्याची किंमत 72,950 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 98,000 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.
सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather Update : पश्चिम बंगाल, ओडीशाला वादळाचा तडाखा, महाराष्ट्रावर परिणाम होणार?
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
मुंबई
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 72,950 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,580 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 59,690 रूपये आहे.
पुणे
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 72,950 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,580 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 59,690 रूपये आहे.
नागपूर
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 72,950 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,580 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 59,690 रूपये आहे.
नाशिक
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 72,980 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,610 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 59,720 रूपये आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT