Gold Rate Today : सोनं खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड! किती रूपयांनी घसरले दर? वाचा 24 कॅरेटचा भाव

रोहिणी ठोंबरे

18 Nov 2024 (अपडेटेड: 18 Nov 2024, 02:16 PM)

Gold-Silver Price Today 18 Nov 2024 : सणासुदीचा हंगाम संपताच सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सणासुदीच्या काळात सोन्याच्या भावाने मोठा उच्चांक गाठला होता.

Mumbaitak
follow google news

Gold-Silver Price Today 18 Nov 2024 : सणासुदीचा हंगाम संपताच सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सणासुदीच्या काळात सोन्याच्या भावाने मोठा उच्चांक गाठला होता. पण आता आठवडाभरात सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज सोमवार 18 नोव्हेंबर 2024 रोजी सोन्याचे भाव प्रचंड घसरले आहेत. त्यामुळे सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. चला तर मग आजच्या सोन्याच्या किंमतीतले बदल जाणून घेऊयात. (Gold-Silver prices today 18 november 2024 what are the rates of 24 22 and 18 carat gold mumbai pune nashik nagpur

हे वाचलं का?

देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 carat सोन्याचा भाव 80,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.

हेही वाचा : Rahul Gandhi : 'एक हैं तो सेफ हैं' घोषणेची खिल्ली उडवली, राहुल गांधींचा PM मोदी-अदानींवर निशाणा

सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती आहे. 

हेही वाचा : Maharashtra Weather : वातावरण निवळणार, थंडीला सुरुवात होणार? वाचा IMD चा अंदाज

Goodreturns वेबसाईटनुसार, रविवारी (17 नोव्हेंबर 2024) 24 carat 10 gm (1 तोळा) सोन्याचा भाव 75,650 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 660 रूपयांनी वाढ झाली असून याची किंमत 76,310 रूपये झाली आहे. तर, 22 carat सोन्याचा भाव 69,350 रूपये होता. त्यातही 600 रूपयांनी वाढ झाली असून त्याची किंमत 69,950 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 89,500 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

Gold Rate 22, 24, 18 carat in Mumbai

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 69,950 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,310 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,230 रूपये आहे.

Gold Rate 22, 24, 18 carat in Pune

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 69,950 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,310 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,230 रूपये आहे.

Gold Price 22, 24, 18 carat in Nagpur

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 69,950 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,310 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,230 रूपये आहे.

10gm 22, 24, 18 carat in Nashik

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 69,980 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,340 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,260 रूपये आहे.

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

22 carat सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 carat सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.

 

    follow whatsapp