Nepal Plane Crash Video:आकाशात झेपावताच फिरलं अन् कोसळलं; विमान अपघात कॅमेऱ्यात कैद

मुंबई तक

24 Jul 2024 (अपडेटेड: 24 Jul 2024, 03:52 PM)

Kathmandu plane crash 2024 today : नेपाळमधील काठमांडू येथे भीषण विमान अपघात घडला. यात 18 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या विमानाच्या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. 

काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघाताचे व्हिडीओ पाहिले का?

नेपाळमधील काठमांडूमध्ये विमानाचा अपघात कसा झाला?

follow google news

बातम्या हायलाइट

point

नेपाळमध्ये विमान अपघात कसा झाला?

point

त्रिभुवन विमानतळावर झालेल्या विमान अपघाताचे व्हिडीओ

point

विमानाचा अपघात होतानाचे व्हिडीओ व्हायरल

Napal plane crash Updates : काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक प्रवाशी विमान आकाशात झेपावले. काही क्षणातच विमान जमिनीवर आदळले आणि 18 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. सौर्य एअरलाईन्स कंपनीच्या विमानाच्या अपघाताचा अखेरच्या काही क्षणातील व्हिडीओ आता समोर आला आहे. (Shocking videos of nepal plane crash)

हे वाचलं का?

नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतलेल्या विमानाचा अपघात झाला. १९ प्रवाशांना पोखराला घेऊन जात असलेले सौर्य एअरलाईन्सचे विमान उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच जमिनीवर धडकले. 

18 प्रवाशांचा जागीच मृत्यू

उड्डाण करत असतानाच विमान धावपट्टीवरून घसरले. हवेत झेपावल्यानंतर विमान एका बाजूने झुकले. त्यानंतर काही क्षणातच हे विमान जमिनीवर कोसळले. जमिनीवर आदळताच विमानाला आग लागली. त्यात 18 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. यात एका वैमानिकाला वाचवण्यात आले असल्याची माहिती आहे. 

हेही वाचा >> वाघनखं खरी की खोटी.. सरकार आणि इतिहास संशोधकाचा दावा काय?

Nepal plane crash today video: विमान अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

सौर्य एअरलाईन्सच्या विमानाचा अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काही व्हिडीओ समोर आले असून, त्यात विमान कशा पद्धतीने धावपट्टीवरून घसरले. ते कसे एका बाजूने झुकले आणि नंतर जमिनीवर येऊ आदळले. त्यानंतर विमानाला आग लागली आणि धुराचे लोट आकाशात झेपावले. 

विमानाचा अपघात का झाला?

स्थानिक माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, विमान दक्षिणेकडील धावपट्टीवरून उड्डाण करत होते. झेपावत असतानाच एका बाजूला झुकले आणि झटके बसले. त्यानंतर विमान जमिनीवर येऊन आदळले. अपघातानंतर लागलेली आग तातडीने आटोक्यात आणण्यास यश न आल्याने विमानाचा जळून कोळसा झाला. 

हेही वाचा >> अजित पवार-अमित शाहांची मध्यरात्री बैठक, हव्यात 'इतक्या' जागा?

वैमानिकावर उपचार सुरू 

नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, विमानातून प्रवास करत असलेल्या 19 पैकी 18 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व प्रवाशी एअरलाईन्स कंपनीचेच कर्मचारी होते. त्रिभुवन विमानतळावरून सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी हे विमान पोखरासाठी आकाशात झेपावले होते. धावपट्टीपासून काही अंतरावर जाऊन कोसळले.

हेही वाचा >> पूजा खेडकर प्रकरणावरून घमासान सुरू असतानाच UPSC अध्यक्षांचा राजीनामा 

अपघातात वैमानिक गंभीर जखमी झाला आहे. ३८ वर्षीय वैमानिक एम.आऱ. शाक्य यांना अपघातस्थळावरून बाहेर काढण्यात आले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे.

    follow whatsapp