HSC Results 2024: राज्यात '12वी'चा निकाल जाहीर, मुंबईचा कितवा क्रमांक?   

रोहिणी ठोंबरे

21 May 2024 (अपडेटेड: 21 May 2024, 12:48 PM)

Maharashtra HSC Class 12 Results : महाराष्ट्र बोर्डाच्या 12वी परीक्षेचा 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. 12वी मध्ये एकूण 93.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रातील 9 विभागांपैकी 'मुंबईचा' किती टक्के निकाल?

point

9 विभागांपैकी मुंबई विभागाचा सर्वात कमी निकाल

point

'12वी'चा निकाल कसा आणि कुठे पाहता येणार?

Maharashtra 12th Result : महाराष्ट्र बोर्डाच्या 12वी परीक्षेचा 2024 चा (Maharashtra HSC Results 2024 Declared) निकाल जाहीर झाला आहे. 12वी मध्ये एकूण 93.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. तसंच, दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जाऊन रोल नंबर टाकून निकाल पाहू शकतात. (HSC Results 2024 12th result maharashtra declared Mumbai have which rank)

हे वाचलं का?

महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेत गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. एकूण 95.44 टक्के मुली यशस्वी झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्केवारी 91.60 टक्के आहे. राज्यातील नऊ विभागांपैकी कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.51 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्राचा बारावीचा निकाल 93.37 टक्के अधिक लागला आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला होता.

हेही वाचा : Pune: आरोपीच्या फरार वडिलांच्या मुसक्या आवळल्या, बिल्डरवर काय होणार कारवाई?

महाराष्ट्रातील 9 विभागांपैकी 'मुंबईचा' किती टक्के निकाल?

  • कोकण : 97.51 टक्के
  • पुणे : 94.44 टक्के
  • कोल्हापूर : 94.24 टक्के
  • अमरावती : 93 टक्के
  • छत्रपती संभाजीनगर : 94.08 टक्के
  • नाशिक : 94.71 टक्के
  • लातूर : 92.36 टक्के
  • नागपूर : 93.12 टक्के
  • मुंबई : 91.95 टक्के

महाराष्ट्रातील 9 विभागांपैकी मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजेच 91.95 टक्के लागला आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 94 टक्के लागला आहे.

    follow whatsapp