Pooja Khedkar : पूजा खेडकरांचा आणखी पाय खोलात, मॉक इंटरव्ह्यू अडचणी वाढणार? Video Viral

मुंबई तक

11 Jul 2024 (अपडेटेड: 11 Jul 2024, 02:49 PM)

IAS Pooja Khedkar Mock interview : महाराष्ट्र केडरच्या 2023 बॅचच्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या त्यांच्या अतिरिक्त मागण्यांमुळे अडचणीत सापडल्या आहेत. त्यांची पुण्यातून वाशीम येथे बदली करण्यात आली आहे.

ias pooja khedkar mock interview video gone viral fake obc and medical certificate

पूजा खेडकर यांच्या मॉक इंटरव्ह्यूचा व्हिडिओ व्हायरल

follow google news

बातम्या हायलाइट

point

पूजा खेडकर यांचा मॉक इंटरव्ह्यूचा व्हिडिओ व्हायरल

point

पूजा खेडकर यांचा मॉक इंटरव्ह्यूत खळबळजनक खुलासा

point

पूजा खेडकर यांच्या वडिलांचे उत्पन्न शून्य आहे का?

IAS Pooja Khedkar Mock interview viral : महाराष्ट्र केडरच्या 2023 बॅचच्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी असलेल्या पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) मोठ्या वादात सापडल्या आहेत. या वादासोबतच खेडकर यांच्याबाबत दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या खुलास्यांमुळे पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सध्या सोशल मीडियावर पूजा खेडकर यांचा मॉक इंटरव्ह्यूचा (Mock interview) व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. या व्हिडिओने देखील त्यांच्या अडचणी आणखीण वाढवल्या आहेत. या व्हिडिओत नेमकं काय आहे? हे जाणून घेऊयात. (ias pooja khedkar mock interview video gone viral fake obc and medical certificate)  

हे वाचलं का?

व्हायरल झालेल्या मॉक इंटरव्ह्यूत काय? 

पूजा खेडकर यांच्या मॉक इंटरव्ह्यूचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत अधिकारी पूजा खेडकर यांना विचारतात तुमचे वडील बँकर आहेत का? यावर पूजा खेडकर म्हणतात नाही ते सिव्हिल सर्वंट आहेत. यावर अधिकारी तुमच्या वडिलांचे शुन्य उत्पन्न आहे का? असा सवाल करतात. यावर पूजा खेडकर यांनी माझे आई वडील विभक्त झाले असून मी माझ्या वडिलांच्या संपर्कात नसल्याचे उत्तर दिले आहे. 

हे ही वाचा : Pooja Khedkar: अखेर IAS पूजा खेडकर आल्या कॅमेऱ्यासमोर, म्हणाल्या मला...

पूजा खेडकर यांनी मुलाखतीत आई-वडील विभक्त झाले आहेत. त्यामुळे मी सध्या आईसोबत राहत असल्याची माहिती दिली आहे. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी त्यांच्या निवडणुकीच्या शपथपत्रात पत्नीसोबत विभक्त झाल्याबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे या मुद्यावरून देखील त्यांच्या अडचणीची वाढण्याची शक्यता आहे.  

नेमकं प्रकरण काय? 

महाराष्ट्र केडरच्या 2023 बॅचच्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या त्यांच्या अतिरिक्त मागण्यांमुळे अडचणीत सापडल्या आहेत. त्यांची पुण्यातून वाशीम येथे बदली करण्यात आली आहे. नवीन अहवालानुसार, पूजा खेडकर यांनी व्हिज्युअली इम्पेअर्ड आणि मेंटल इलनेस असल्याची सर्टिफिकेट सादर करून UPSC ची परीक्षा दिली होती. त्याआधारे विशेष सवलत मिळवून त्या आयएएस झाल्या. त्यांना जर ही सवलत मिळाली नसती तर जितके गुण त्यांना मिळाले आहेत त्यात त्यांना IAS पद मिळणे अशक्य होते. 

हे ही वाचा : Mumbai Weather Update: मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता; असा आहे हवामान विभागाचा अंदाज

दरम्यान निवड झाल्यानंतर पूजा खेडकर यांची वैद्यकीय तपासणी होणार होती. एम्सने त्यांना सहावेळा चाचणीसाठी बोलावले होते. मात्र सहाही वेळा त्या चाचणीसाठी उपस्थित राहिल्या नाहीत. याउलट त्यांनी बाहेरच्या वैद्यकीय एजन्सीकडून एमआरआय अहवाल सादर करणे निवडले, जे UPSC ने स्वीकारण्यास नकार दिला.  त्यानंतर सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ब ट्रिब्युनल म्हणजे कॅट मध्ये पूजा खेडकर यांच्या नियुक्तीला आव्हान दिले होते. 23 फेब्रुवारी 2023 रोजी कॅटने पूजा खेडकर यांच्याविरोधात निकाल दिला होता. मात्र त्यानंतरही पूजा खेडकर यांनी सादर केलेले वादग्रस्त प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात आले आणि त्यांची निवड वैध ठरवण्यात आली. 

    follow whatsapp