Maharashtra Weather : मुंबई, पुणे,कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांमध्ये पाऊस घालणार धुमाकूळ!

मुंबई तक

31 Jul 2024 (अपडेटेड: 31 Jul 2024, 09:16 AM)

Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असून, पुढील 5 दिवसांमध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, कोकण, विदर्भ, मराठवाड्यासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

महाराष्ट्रात ३१ जुलै रोजी हवामान कसे असेल?

मुंबई, पुणे, ठाण्यासह महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा अंदाज.

follow google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्र हवामान अंदाज 31 जुलै

point

मुंबई, पुणे, कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

point

विदर्भातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Mumbai, Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. (IMD Predicts that Heavy to very Heavy Rainfall in Maharashtra including Mumbai, pune, konkan, west Maharashtra, Vidarbha and marathwada)

हे वाचलं का?

दोन दिवस राज्यात पावसाचा जोर कमी झाला होता. गुरुवारीपासून म्हणजेच 1 ऑगस्टपासून महाराष्ट्रात पाऊस वाढणार असल्याचा अंदाज आहे. 

महाराष्ट्रात 31 जुलै रोजी कसे हवामान?

हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, तसेच विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. 

1 ऑगस्टपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

महाराष्ट्रात गुरुवारपासून पावसाचा जोर जास्त वाढणार आहे. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक असेल. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा >> अमोल मिटकरींची गाडी फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू! 

हवामान विभागाने पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

पुणे, कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

2 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

हेही वाचा >> चित्रा वाघ यांची 'ऑडिओ क्लिप'.. विद्या चव्हाणही भिडल्या, नेमकं काय घडलं?

मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर, मराठवाड्यातील जालना, परभणीसह काही जिल्ह्यांत आणि विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

    follow whatsapp