Property Indexation: घर, मालमत्ता विकताना बसणार झटका!'हा' नियम बदलला

मुंबई तक

24 Jul 2024 (अपडेटेड: 24 Jul 2024, 08:27 AM)

Long-term capital gains tax hiked : इंडेक्सशन पद्धतीमध्ये तुमच्या मालमत्तेची नवीन किंमत महागाई दरानुसार मोजली जायची, त्यानंतर शिल्लक रकमेवर 20 टक्के कर आकारला जायचा. मात्र आता त्यात बदल करण्यात आला आहे.

इंडेक्सशन टॅक्स काय आहे?

केंद्र सरकारने इंडेक्सशन बेनिफिट नियम काढून टाकला आहे

follow google news

बातम्या हायलाइट

point

मालमत्तेतील नफ्यातील हिस्सा जाणार केंद्राच्या तिजोरीत

point

इंडेक्सशन बेनिफिट नियम काय आहे?

point

केंद्राने कर केला कमी, पण हा नियम बदलला

What is Indexation Tax : तुम्ही प्रॉपर्टी किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली असेल किंवा कुठेही गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला या अर्थसंकल्पामध्ये केलेले महत्त्वाचे बदल माहित असणे आवश्यक आहे. सरकारने या अर्थसंकल्पात भांडवली लाभ करात बदल करत असल्याची घोषणा केली आहे. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे भांडवली नफा कर (capital gains tax) म्हणजे तुम्ही केलेल्या गुंतवणुकीत जो नफा मिळणार आहे, त्यावर लादलेला कर. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात भांडवली लाभ करामध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत. तसेच इंडेक्सेशन लाभाचा नियम काढून टाकला आहे, ज्याचा परिणाम प्रामुख्याने रिअल इस्टेट व्यवहारांवर होणार आहे. (Indexation Tax removed by Central Government)

हे वाचलं का?

Indexation Tax Update : काय बदल झाले?

मालमत्तेच्या विक्रीवर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स अर्थात दीर्घ कालीन गुंतवणूक नफा कर (LTCG) 20 टक्क्यांवरून 12.5 टक्के ​​करण्यात आला आहे. अर्थमंत्र्यांनी दीर्घ मुदतीची व्याख्याही स्पष्ट केली.

हेही वाचा >> 'राज्यातल्या जमिनी विकून पैसे देऊ का?', अजितदादा संतापले.. मंत्रिमंडळ बैठकीतील Inside Story 

सूचीबद्ध वित्तीय मालमत्ता एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ ठेवल्यासच ती दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून गणली जाईल. यामध्ये शेअर्स आणि म्युच्युअल फंडांचाही समावेश असेल त्याच वेळी, जर असूचीबद्ध आर्थिक किंवा गैर-आर्थिक मालमत्ता 2 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ ठेवली असेल, तर ती दीर्घकालीन गुंतवणूक मानली जाईल, असेही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

घर विकताना बसणार झटका

सरकारच्या या निर्णयामुळे मालमत्ता विक्रेत्यांना धक्का बसू शकतो. खरंतर मालमत्ता विक्रीवर आत्तापर्यंत मिळणारा इंडेक्सेशन लाभ या अर्थसंकल्पात काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे घर विकल्यानंतर जो नफा येईल, त्यासाठी भरावा लागणाऱ्या कराची रक्कम वाढणार आहे. 

इंडेक्सेशन लाभ म्हणजे काय?

इंडेक्सेशन लाभामध्ये, तुमच्या मालमत्तेची नवीन किंमत चलनवाढीच्या दरानुसार मोजली जायची. त्यानंतर शिल्लक रकमेवर 20 टक्के कर आकारला जातो. मात्र आता त्यात बदल करण्यात आला आहे.

हेही वाचा >> पहिली नोकरी लागताच मोदी सरकार देणार 15000, पण... 

उदाहरणार्थ, जर तुम्ही दहा वर्षांपूर्वी 50 लाख रुपयांची मालमत्ता (घर) खरेदी केली असेल आणि आज त्याची किंमत 2 कोटी रुपये झाली आहे. आता अशा परिस्थितीत तुम्ही ही मालमत्ता विकल्यास आधीच्या नियमानुसार त्यावर इंडेक्सेशन बेनिफिट लागू होईल. याचा अर्थ, महागाई लक्षात घेऊन, तुमचे 50 लाख रुपयांचे नवीन मूल्य काढले जाईल.

हेही वाचा >> नव्या आयकर रचनेमुळे तुम्हाला किती रुपयांचा फायदा होणार?

आता समजा महागाई निर्देशांकानुसार, तुम्ही खरेदी केलेल्या घर किंवा जमिनीची किंमत 50 लाख रुपये होती आणि आज तिची किंमत 1.25 कोटी रुपये आहे. तर नियमानुसार दीर्घकालीन लाभ करावर 75 हजार रुपयांवर 20 टक्के दराने कर आकारला जातो. मात्र आता हा नियम हटवण्यात आला आहे.

    follow whatsapp