Kullu landslide video news in marathi : हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे डोंगरावर विनाश सुरूच आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे गुरुवारी झालेल्या पावसामुळे अनेक बहुमजली इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. हा भीषण विध्वंस व्हिडिओमध्ये दिसत आहे.
ADVERTISEMENT
कुल्लू येथील नवीन बसस्थानकाजवळ पावसामुळे मोठी दुर्घटना घडली. अवघ्या 26 सेकंदात 7 बहुमजली इमारती एकामागून एक कोसळल्या. सततच्या पावसामुळे या इमारतींना भेगा पडल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना तीन दिवसांपूर्वीच खबरदारीचा उपाय म्हणून दुसरीकडे हलवण्यात आले होते.
कुल्लु : 7 इमारती कोसळल्या, 1 कोसळण्याची भीती
कुल्लु येथील 7 इमारती गुरुवारी सकाळी कोसळल्या. यातील एक इमारत कोसळण्याचा धोका अजूनही कायम आहे.
हिमाचल प्रदेशात संततधार पावसाने कहर केला आहे. राज्याची राजधानी शिमला येथे 2017 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. येथे 122 वर्षांचा विक्रम मोडला गेला आहे.
वाचा >> Brown, Whole Wheat, Multigrain Bread : ब्रेड खाणं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं की हानिकारक?
हिमाचलच्या मंडी, शिमला आणि सोलनमध्ये गेल्या 24 तासांत ढगफुटीच्या 4 घटना घडल्या आहेत. राज्यात पावसामुळे एका दिवसात 11 जणांना जीव गमवावा लागला आहे. यापैकी शिमल्यात 3 तर मंडीत 8 जणांचा मृत्यू झाला.
वाचा >> Chandrayaan 3 Update : विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हर 14 दिवस चंद्रावर काय करणार?
दरम्यान 18 वाहनांचेही नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शिमलातील अनेक रस्ते बंद करण्यात आले. शिमल्यात जवळपास 35 घरे रिकामी करण्यात आली. हिमाचलच्या हमीरपूर, मंडी, शिमला आणि सोलनमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या. राज्यातील तीन राष्ट्रीय महामार्ग आणि 538 रस्ते बंद करण्यात आले आहेत.
पावसाळ्यात 300 हून अधिक लोकांचा झाला मृत्यू
हिमाचलमध्ये यंदा पावसाचे विध्वंसक रुप बघायला मिळत आहे. राज्यात संततधार पाऊस आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 300 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 10 हजारांहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर राज्यात सुमारे 10 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. अनेक रस्ते वाहून गेले, शेकडो पूल तुटले आहेत.
ADVERTISEMENT