Lakhimpuri Kheri Mla Yogesh Verma Viral Video : राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये भाजप आमदार योगेश वर्मा यांना भर रस्त्यात मारहाण करण्यात आली. वर्मा यांच्या बाजूला पोलीस कर्मचारी असतानाही बार संघाचे अध्यक्ष अवधेश सिंगने वर्मा यांना कानशिलात लगावली. वर्मा यांच्यावर हल्ला झाल्याच्या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेमकं प्रकरण काय आहे? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती. (A shocking video has come out from the political circle. BJP MLA Yogesh Verma was beaten up on the road in Uttar Pradesh's Lakhimpur)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, अर्बन बँक निवडणुकीबाबत बार संघाचे अध्यक्ष अवधेश सिंग आणि आमदार योगेश वर्मा यांच्यात बाचाबाची झाली. यामुळे दोन्ही पक्षाचे नेते आमनेसामने आले. त्यानंतर संतापलेल्या अवधेश सिंग यांनी पोलिसांच्या समोरच आमदार वर्मांच्या कानाखाली मारली. त्यानंतर दुसऱ्या वकिलानेही आमदाराला घेरलं आणि मारहाण केली.
हे ही वाचा >> हरियाणाच्या विधानसभेत फुललं BJP चं कमळ! महाराष्ट्राच्या राजकारणावर काय होणार परिणाम?
वादविवाद सुरु झाल्यानंतर आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते सिंग यांच्यावर धावल. परंतु, पोलिसांनी वर्मा यांच्या कार्यकर्त्यांना रोखलं. या संपूर्ण प्रकरणामुळं शहरातील अर्बन कॉपरेटिव्ह बँकेच्या समोर मोठा गोंधळ उडाला. आमदार वर्मा यांनी आजतकला प्रतिक्रिया देताना म्हटलं, अर्बन कॉऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक आहे. भाजप कार्यकर्ते अर्ज घेण्यासाठी आले होते.
इथे पाहा आमदार योगेश वर्मा यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ
यावेळी त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. आधी व्यापार मंडलाचे नेते राजू अग्रवाल यांना मारलं आणि त्यांचा अर्ज फाडला. मी त्यांना पाहायला आलो, तेव्हा अवधेश सिंगने माझ्यावरही हात उचलला. त्यांनी माझी कॉलर पकडली. त्यांना या घटनेची खूप मोठी किंमत मोजावी लागेल. या घटनेनंतर प्रशासन सक्रिय झालं आहे. अवधेश सिंग आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून लोकांचे अर्ज फाडण्यात येत आहेत.
ADVERTISEMENT