Robbery Viral Video : नवरात्री-दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग असते. विशेषत: महिला आकर्षक दागिने घेण्यासाठी सराफा बाजारात धावपळ करत असतात. पण हे दागिने खरेदी करताना तुम्ही गाफिल राहिलात तर लाखोंच्या ऐवज काही सेकंदातच लंपास झाल्याशिवाय राहणार नाही. होय, हे खरंच आहे. कारण एका चोरट्याने 30 सेकंदात 28 किलो चांदीचे दागिने चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सलवार-सूट घालून महिलेच्या वेशात आलेल्या चोरट्याने स्कुटीवर बसलेल्या एका व्यक्तीचे लाखो रुपयांचे दागिने लुटले. (Women rush to the market to buy attractive jewellery. But if you are careless while buying these jewels, then lakhs will be lost in seconds)
ADVERTISEMENT
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादच्या कृष्णा नगरमध्ये दुकानाच्या बाहेर एक कर्मचारी स्कूटीवर 28 किलो चांदीने भरलेली बॅग घेऊन बसला होता. त्यावेळी या चोरट्याने संधी साधून चांदीची बॅग खेचली आणि त्या ठिकाणाहून फरार झाला. या चोरीच्या घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून लोकांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: सर्वात मोठी अपडेट! लाडक्या बहिणींना मिळणार FREE मोबाईल?
लोकांना थक्क करणाऱ्या या व्हिडीओत पाहू शकता की, सलवार-सूट घालून महिलेच्या वेशात राहून या चोरट्याने लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. स्कूटीवर बसलेल्या एका व्यक्तीजवळ 28 किलोची चांदीने भरलेली बॅग होती. त्यावेळी चोरट्याने संधी साधून हे दागिने चोरले आणि त्या ठिकाणाहून पळ काढला. चोराने पूर्णपण महिलेचा वेश धारण केला आहे, हे व्हिडीओत पाहू शकता. चोरट्याने सलवार, सूट, दुपट्टा आणि चेहऱ्यावर मुखवटा घातला होता. त्यामुळे या चोरट्याला ओळखणं खूप कठीण असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
इथे पाहा चोरीच्या घटनेचा थरारक व्हिडीओ
चोराने खूप चालाखीने स्कुटीवर बसलेल्या व्यक्तीला चकवा दिला आणि चांदीने भरलेली बॅग खेचून पसार झाला. सोशल मीडियावर चोरीच्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांना धक्काच बसलाय. या अनोख्या चोरीच्या घटनेवर लोकांनी प्रतिक्रियांचा भडीमार केला आहे. महिलेच्या वेशात आलेला चोर, असं कॅप्शन देत व्हिडीओ शेअर केला जात आहे. या चोरीच्या घटनेप्रकरणी पोलीस कसून चौकशी करणार असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT