Baba Siddique: राजकीय प्रवास ते बॉलिवूड कनेक्शन! बाबा सिद्दीकींबद्दल माहित नसलेल्या 'त्या' गोष्टी...

मुंबई तक

13 Oct 2024 (अपडेटेड: 13 Oct 2024, 11:54 AM)

Baba Siddique : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर बांद्रा पूर्व येथे खेरवाडी परिसरात ही घटना घडली आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येशीसंबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी

point

बाबा सिद्दीकी कोण होते?

point

बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन! 

Baba Siddique : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर बांद्रा पूर्व येथे खेरवाडी परिसरात ही घटना घडली आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडल्या असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. (Baba Siddique shot dead in bandra east murder news his political journey to bollywood Connection know unkown stories of him)

हे वाचलं का?

बाबा सिद्दीकी यांना Y श्रेणीची सुरक्षा मिळाली होती. आपल्या जीवाला धोका असल्याची चिंता त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने त्यांना Y श्रेणीची सुरक्षा दिली. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांना कोणतेही धमकीचे पत्र मिळाले नसल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. बाबा सिद्दीकींसोबत तीन पोलिसही उपस्थित असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : Baba Siddique : 'बाबा सिद्दीकी' यांची हत्या करणारे ते तीन शूटर्स कोण? Photo आला समोर

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येशीसंबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी आरोपींनी 9.9 एमएम पिस्तूल वापरल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी पिस्तूलही जप्त केले आहे.

अतिरिक्त सीपी परमजीत सिंह दहिया यांनी सांगितले की, निर्मल नगरमध्ये शनिवारी रात्री 9.30 वाजता ही घटना घडली. त्यानंतर बाबांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या घटनेचा तपास मुंबई गुन्हे शाखेने हाती घेतला आहे.

बाबा सिद्दीकी कोण होते?

झियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दिकी हे वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले आहेत. मात्र, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपचे उमेदवार आशिष शेलार यांच्याकडून पराभूत झाले होते. काँग्रेस सरकारमध्ये ते मंत्रीही होते. काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयमधून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यानंतर 1999 मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते.

बाबा सिद्दिकी हे 1992 आणि 1997 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. 2000-2004 या कालावधीत काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दिकी यांची नियुक्तीही केली होती. बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीवर महत्त्वाच्या पदावरही होते.

हेही वाचा : Baba Siddique: बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या बातमीने अजितदादांना बसला धक्का, म्हणाले मला तर...

लोकसभा निवडणूक 2024 च्या आधी बाबा सिद्दिकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकी हे वांद्रे पूर्व येथून काँग्रेसचे आमदार आहेत. 

बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन! 

बाबा सिद्दीकी एक जबरदस्त नेता असण्यासोबतच अप्रतिम माणूसही होते. सलमान आणि शाहरूखसोबत त्यांचे संबंध चांगले होते. सलमान त्यांच्या प्रत्येक इफ्तार पार्टीत प्रमुख पाहुणा म्हणून हजर असायचा. रात्री उशिरा बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची बातमी समजताच सलमान तत्काळ मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचला.

बाबा सिद्दीकी यांचं बॉलिवूडशी खास कनेक्शन आहे. संपूर्ण बॉलिवूड त्यांच्या इफ्तार पार्टीला हजर असतं. दरवर्षी ईदच्या खास मुहूर्तावर बाबा सिद्दीकी मुंबईत इफ्तार पार्टीचे आयोजन करतात. ज्यामध्ये चित्रपट जगतातील दिग्गज कलाकार उपस्थित राहतात.

    follow whatsapp