Baba Siddiqui Shot Dead : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीक यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी (12 ऑक्टोबर) संध्याकाळी वांद्रे पूर्व येथे तीन अज्ञातांनी गोळीबार केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, माजी राज्यमंत्र्यांना जवळच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर लगेचच दोन आरोपींना अटक करण्यात आली. तर, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खळबळ उडाली आहे. (baba siddiqui shot dead murder in bandra east nirmal nagar police arrested 2 accused photo viral of them)
ADVERTISEMENT
बाबा सिद्दीकींच्या गाडीवर गोळीबार
माहितीनुसार, बाबा सिद्दीकींवर हल्ला करणारे एकूण तीन आरोपी होते. ते कार्यालयाबाहेर पडताच हल्लेखोर धावत आले आणि त्यांनी सिद्दीकी यांच्यावर अंदाधुंद गोळ्या झाडल्या. त्यांना तीन गोळ्या लागल्या, त्यापैकी एक गोळी छातीत लागली. गोळीबारानंतर लगेचच अंधेरी पूर्व येथून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन आरोपींची ओळख पटली
पोलिस सूत्रांनी सांगितले की, 1 आरोपी हरियाणाचा तर 1 आरोपी उत्तर प्रदेशचा आहे. मात्र, अद्याप 1 आरोपी संशयित आहे. या हत्येसाठी अन्य राज्यातील शूटरला कंत्राट देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच आरोपींबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा : Baba Siddique Death : खळबळजनक! अजित पवारांचे नेते बाबा सिद्दीकींची हत्या, गोळीबारात झाला मृत्यू
बाबा सिद्दिकींच्या हत्येप्रकरणी एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या घटनेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ही अत्यंत दुर्दैवी घटना असून मी डॉक्टर आणि पोलिसांशी बोललो आहे. दोघांना अटक करण्यात आली असून, आरोपी उत्तर प्रदेश आणि हरियाणाचे आहेत. तिसरा आरोपी फरार आहे. कायदा आणि सुव्यवस्था आपल्या हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना आम्ही मुंबई पोलिसांना दिल्या आहेत. मला खात्री आहे की मुंबई पोलीस लवकरच तिसऱ्या आरोपीला अटक करतील. आरोपींवर कडक कारवाई केली जाईल.
ADVERTISEMENT