Rain Updates : दहीहंडी दिवशीच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला आहे. मुंबईसह शहर परिसरात दहीहंडीचा उत्सव चालू असतानाच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे आता राज्यतील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या महिन्यात राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला तर रब्बी हंगामाला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली असली तरी सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात मात्र पावसाची शक्यता नसल्याचे पुणे वेधशाळेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
रब्बी हंगाम चांगला
सप्टेंबर महिन्यात पाऊस चांगला झाला तर याचा सगळ्यात जास्त फायदा रब्बी हंगामाला होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजाराला मोठा फटका बसला होता. तर आता या काळात पाऊस झाला तर मात्र रब्बी हंगामाला मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोकणसह राज्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला होता. या महिन्यात पाऊस झाला तर मात्र बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे.
हे ही वाचा >> Maratha Morcha : जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांना भेटणार, आज तोडगा निघणार?
बंगालच्या उपसागरातील परिस्थिती
राज्यभरात मान्सून सक्रिय होण्यास बंगालच्या उपसागारातील बदलली परिस्थिती कारणीभूत ठरली आहे. बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रावरुन पश्चिमी वारे वाहू लागले, त्यामुळे महाराष्ट्रात आता मान्सून सक्रिय झाला आहे. बंगालच्या उपसागात पश्चिमी वारे वाहू लागल्यामुळे राज्याभर मध्यम पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. पश्चिमी वारे सक्रिय झाल्यामुळे आता कोकणसह महाराष्ट्रातील पश्चिम घाटासह धुळे आणि जळगाव जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे.
सर्वत्र मध्यम पाऊस
पुणे वेधशाळेने महाराष्ट्रातील काही भागात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागाला या पावसाचा मोठा फायदा होणार आहे. जून ते ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नाही. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे आता पुन्हा जर पाऊस झाला तर त्याचा मोठा फायदा रब्बी हंगामाला होणार आहे.
हे ही वाचा >> Sudhir More : ‘माझ्याशी संबंध ठेव नाहीतर…’; आत्महत्येपूर्वी महिलेचे 56 कॉल, आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण
कोकण आणि मध्य महाराष्ट्र
दहीहंडीदिवसांपासून सक्रिय झालेला मान्सून आता कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार बरसणार असल्याचे पुणे वेधशाळेने सांगितले आहे. मध्यम आणि मुसळधार पाऊस होणार असला तरी धुळे आणि जळगाव जिल्ह्यात मात्र पावसाची शक्यता नसल्याचेही वेधशाळेने सांगितले आहे.
ADVERTISEMENT
