Rain Update: गेल्या आठवड्याभरापासून राज्यात मान्सून (Monsoon) सक्रिय झाला आहे. मात्र अजूनही राज्यात पावसाने सरासरी गाठली नसल्यामुळे राज्यात पावसाची तूट कायम आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवली आहे मात्र एकूण तूट 9 टक्के असल्याचे हवामान खात्याकडून (Meteorological Department) सांगण्यात आले आहे. ही तूट मध्य महाराष्ट्रात 20 टक्के तर मराठवाड्यात 24 टक्के असल्याचेही हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (heavy rain occur in Konkan and western Maharashtra including Mumbai)
ADVERTISEMENT
कमी दाबाचे पट्टे
पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रासह मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. या कमी दाबाच्या पट्यामुळे मुंबईसह कोकणातीह जोरदार पाऊस असणार अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
हे ही वाचा >> कांदा महागणार ! व्यापाऱ्यांनी पुकारला बेमुदत संप, नेमक्या मागण्या काय?
दक्षिण कोकणात दमदार
पश्चिम बंगालच्या उपसागरात 24 ते 26 सप्टेंबर या काळात मुंबई, संपूर्ण कोकण, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, आणि पुणे जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होणार आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर आजपासून 24 सप्टेंबरपर्यंत उत्तर आणि दक्षिण कोकणात दमदार पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हे ही वाचा >> Womens Reservation Bill: ऐतिहासिक… महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत एकमताने मंजूर!
पावसाची तूट
सप्टेंबर महिन्यात राज्यातील काही भागात जोरदार पाऊस होणार असला तरी महाराष्ट्रात एकूण पावसाची तूट 9 टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्रात 20 टक्के तर मराठवाड्यात 24 टक्के तूट आहे. तरीही सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ADVERTISEMENT