Maharashtra SSC Result 2024 Online: 10वीचा निकाल मोबाइल आणि वेबसाइटवर कसा पाहायचा?

रोहिणी ठोंबरे

• 10:50 AM • 27 May 2024

Maharashtra SSC Result 2024 : 12वीचा निकाल लागल्यावर 10वीचा निकाल कधी लागणार या बाबत अनेकांना प्रतीक्षा होती. आज 27 मे 2024 रोजी दहावीचा निकाल लागणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल लागेल.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

विद्यार्थ्यांना 'या' वेबसाइट्सवर पाहता येणार 10वीचा निकाल?

point

10वीचा निकाल वेबसाइटवर कसा पाहायचा?

point

SMS द्वारे ऑफलाइन निकाल कसा पाहायचा? 

SSC Result 2024 Online and Offline: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra Board SSC Result 2024) दहावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठी अपडेट समोर आली आहे. 12वीचा निकाल लागल्यावर 10वीचा निकाल कधी लागणार या बाबत अनेकांना प्रतीक्षा होती. आज 27 मे 2024 रोजी दहावीचा निकाल लागणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल लागेल.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ आज 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन या बाबत माहिती देणार आहे. (Maharashtra SSC Result 2024 How to Check 10th Result on Mobile and Website)

हे वाचलं का?

विद्यार्थ्यांना आपला निकाल https://mahahsscboard.in/mr या लिंकद्वारे ऑनलाइनच पाहता येईल. दरवर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर दहावीचा निकाल जाहीर केला जातो. त्याचप्रमाणे यंदा देखील जाहीर केला जाईल. यावर्षी, राज्यभरातून 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी इयत्ता 10वी बोर्डाची परीक्षा दिली आहे. ही परीक्षा 1 मार्चपासून सुरू झाली होती आणि 26 मार्च 2024 रोजी संपली होती. 

    follow whatsapp