कल्याण: सिंधुदुर्गातील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं वृत्त समोर आल्यापासून या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा त्याच्या राहत्या घरातून फरार झाला होता. घटनेच्या दिवशी सगळ्यात शेवटी मुंबई Tak सोबत बोलताना जयदीप आपटे याने आपण मालवणला जात असल्याचं म्हटलं होतं. पण तेव्हापासून तब्बल 10 दिवस तो फरार झाला होता. पण असं असलं तरी आता या सगळ्या प्रकाराबाबत एक धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. (shivaji maharaj statue collapse case why did police not find jaydeep apte who was in touch with lawyer what is really happening)
ADVERTISEMENT
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रातील जनमानसात प्रचंड संतापाचं वातावरण होतं. त्यामुळे शिल्पकार जयदीप आपटे याला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी ही सातत्याने केली जात होती. दुसरीकडे सरकार अनेकदा हे सांगत होतं की, जयदीप आपटेच्या अटकेसाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. पण तो फरार आहे. त्यासाठी पोलिसांनी लूकआऊट नोटीसही जारी केली होती.
हे ही वाचा>> Shivaji Maharaj Statue : मोठी बातमी! शिल्पकार जयदीप आपटेला 'इथून' केली अटक, नेमका कसा सापडला?
एकीकडे पोलीस असं म्हणत असले तरी तब्बल 10 दिवसांपासून बेपत्ता असलेला जयदीप आपटे हा त्याच्या वकिलांशी अगदी चोखपणे संपर्कात होता. असं असताना जयदीप आपटे हा केवळ पोलिसांनाच कसा गुंगारा देत होता? असा सवाल आता अनेक जण उपस्थित करत आहेत..
'पोलिसांनी अटक केली नाही, जयदीप आपटे स्वत: शरण आला...'
जयदीप आपटे याला काल (4 सप्टेंबर) रात्री कल्याणमधून अटक करण्यात आल्यानंतर असं वृत्त समोर आलं की, तो आपल्या कुटुंबीयांना कल्याणमध्ये भेटण्यासाठी आलेला असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
हे ही वाचा>> Jaydeep Apte: 'ठरलं होतं, तसं घडलं...' जयदीप आपटेला पोलिसांनी शोधलं नाही, तर... वाचा Inside Story
मात्र, आता जयदीप आपटे याचे वकील गणेश सोवनी यांनी असा दावा केला आहे की, जयदीप याला पोलिसांनी अटक वैगरे केली नाही. तर तो स्वत:हून पोलिसांना शरण आला. त्याच्या कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतरच त्याने पोलिसांना शरण येण्याचा निर्णय घेतला. असं त्याच्या वकिलांनी पोलिसांना सांगितलं.
वकिलाच्या संपर्कात होता जयदीप आपटे, पण...
तब्बल 10 दिवस फरार असलेला जयदीप आपटे हा त्याचे वकील गणेश सोवनी यांच्या संपर्कात असल्याचं स्वत: सोवनी यांनीच सांगितलं आहे. ज्यामुळे आता या प्रकरणी पोलिसांच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहेत.
पोलिसांकडे असलेली प्रचंड मोठी यंत्रणा, तांत्रिक उपकरण आणि तज्ज्ञांची फौज असतानाही पोलीस जयदीप आपटेला का पकडू शकले नाहीत? असा सवाल आता अनेक जण विचारत आहेत.
जेव्हा पत्रकारांनी जयदीप आपटेच्या वकिलाला जयदीप आपटेशी काय बोलणं झालं होतं? असा सवाल विचारला असता गणेश सोवनी म्हणाले की, ''पक्षकाराशी झालेलं संभाषण कुठलाही वकील सांगत नाही. पण संपर्क झालेला होता एवढं नक्की?' अशी माहिती जयदीप आपटेच्या वकिलांनी दिली आहे.'
यावरून हे स्पष्ट होतं की, आरोपी जयदीप आपटे मागील काही दिवस त्याच्या वकिलाच्या संपर्कात होता. पण तरीही तो पोलिसांना मात्र सापडत नव्हता.
ADVERTISEMENT
