Maharashtra Weather: अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूरमध्ये सूर्य आग ओकणार! फक्त 'या' भागात पडणार पावसाच्या सरी

Maharashtra Weather Today : मागील दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सूर्य आग ओकत असल्याचं पाहायला मिळतंय. सोमवारी चंद्रपूरमध्ये 45 अंश सेल्सियस इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली.

Maharashtra Weather Today

Maharashtra Weather Today

मुंबई तक

• 07:00 AM • 23 Apr 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात कोणत्या जिल्ह्यात उसळणार उष्णतेची लाट?

point

कोणत्या जिल्ह्यात पडतील पावसाच्या सरी?

point

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कसं असेल आजचं हवामान?

Maharashtra Weather Today : मागील दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सूर्य आग ओकत असल्याचं पाहायला मिळतंय. सोमवारी चंद्रपूरमध्ये 45 अंश सेल्सियस इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, छत्रपती संभाजी नगर, जालना, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्ध्यात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. दरम्यान, आज बुधवारी 23 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान कसं असणार आहे, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती. 

हे वाचलं का?

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कसं असेल आजचं हवामान?

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, छत्रपती संभाजी नगर, जालनामध्ये कोरडं हवामान असणार आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धारशिवमध्ये उष्ण व दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे ही वाचा >> भयंकर... काश्मीरमध्ये पर्यटकांवर झाडल्या गोळ्या, महाराष्ट्रातील जखमी पर्यटकांची यादी आली समोर!

विशेष म्हणजे अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूरमध्ये उष्णतेच्या लाटा पसरणार आहेत. तर कोल्हापूर घाट परिसरात हलक्या व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. तर भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळमध्ये हवामान विभागाकडून कोणताही इशारा देण्यात आला नाही. 

काल मंगळवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, परभणी, बीड, हिंगोलीमध्ये कोरड्या हवामाची शक्यता वर्तवण्यात आली होती. कोल्हापूर घाट परिसर, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. 

हे ही वाचा >> UPSC Result 2024 Shakti Dubey: UPSC परीक्षेत संपूर्ण देशात पहिली आलेली 'शक्ती' आहे तरी कोण?

    follow whatsapp