Maharashtra Weather: बाप्प्पाच्या आगमनाला पावसाची हजेरी? पाहा तुमच्या शहरातील IMD चा अंदाज 

मुंबई तक

07 Sep 2024 (अपडेटेड: 07 Sep 2024, 10:07 AM)

Maharashtra Weather News Update : यंदा राज्यभरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांतील नदी-नाले आणि धरणे तुडूंब भरली आहेत.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

यंदा राज्यभरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे.

point

मुंबईत हवमानाचा अंदाज काय?

point

‘या’ जिल्ह्यांना IMD चा अलर्ट  

Maharashtra Weather News Update : यंदा राज्यभरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांतील नदी-नाले आणि धरणे तुडूंब भरली आहेत. अशावेळी आज (7 सप्टेंबर 2024) गणपती बाप्पाच्या आगमनादिवशी राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवविला आहे. (maharashtra Weather update today ganesh chaturthi 2024 IMD alert mumbai pune weather report 7 september 2024)

हे वाचलं का?

10 दिवस चालणाऱ्या या उत्सवानिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. यातच आता शनिवारी गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशीच राज्यातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. शनिवार ते सोमवारपर्यंत मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. 

हेही वाचा : Crime : रात्री हातावर मेहंदी काढली, सकाळी आईचा मृतदेह पाहून मुलीने...संभाजीनगर हादरलं!

मुंबईत हवमानाचा अंदाज काय?

पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज आहे. शहर आणि उपनगरात मधूनमधून मध्यम पावसाच्या शक्यतेसह सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२°C आणि २६°C च्या आसपास असेल.

‘या’ जिल्ह्यांना IMD चा अलर्ट  

काही जिल्ह्यांना ऑरेज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रामुख्याने घाट परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. IMD च्या अंदाजानुसार, आज मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, धाराशिव जिल्ह्यात दिवसभर पावसाची शक्यता आहे. तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा : Ladki Bahin yojana: अर्ज मंजूर झालाय, पण Village, Ward लेव्हल पेंडिंग; 3000 मिळणार की नाही?

कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp