Manoj Jarange On SIT Inquiry : (इसरार चिश्ती, छत्रपती संभाजीनगर) मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत (२७ फेब्रुवारी) केली. यावर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. जरांगे यांनी फडणवीस यांना काही सवाल केले. जरांगे काय म्हणाले वाचा...
ADVERTISEMENT
मनोज जरांगे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
"मी आधीच सांगितलं आहे की, हे षडयंत्र रचायला लागेलत, मला गुंतवण्यासाठी. तसे लोक यांनी तयार करून मुंबईत नेऊन बसवले आहेत. हेही मी आधीच मराठा समाजाला सांगितलं आहे. त्यापेक्षा सरळ सांगितलं की, तू (देवेंद्र फडणवीस) इकडे काय षडयंत्र करतो, मीच तुझ्या घरी येतो", असं जरांगे म्हणाले आहेत.
हेही वाचा >> जरांगेंची एसआयटी चौकशी करणार; फडणवीसांनी विधानसभेत काय सांगितलं?
"हे मला गुंतवणारचं होते, कारण मराठा समाज यांच्या पूर्णविरोधात गेलेला आहे आरक्षणासाठी. स्वतःच्या लेकरासाठी मराठे विरोधात जाणार नाही, तर तुझ्यासाठी जातील का? आम्ही ७० वर्षे घातली ना. एवढा निष्ठावान आंदोलक यांना भेटला नव्हता म्हणून ही सगळी टोळी एक झाली", असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला.
तुझ्या बाजूने फक्त नेते आहेत -जरांगे
जरांगे पुढे म्हणाले, "हे म्हणताहेत सगळा मराठा समाज माझ्या बाजूने आहे, कुणी नाही तुझ्या (फडणवीस) बाजूने फक्त नेते आहेत. मराठ्यांनो, यंत्रणेचा दुरुपयोग करून मला गुंतवणार आहेत. पण, मी भीतच नाही. चौकशीला बोलवल्यावर लोक दवाखान्यात जातात, मला बोलवलं तर मी सरळ जाईन. तू कितीही डाव रच... तुला कितीही एसआयट्या रचायच्या काय करायचं ते कर."
"मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणारच नाहीये. तुम्ही न टिकणारं देता. आमच्या आया बहिणींना हाणतात, त्यावेळी तुम्ही दात काढता, हसता, गृहमंत्री असून."
"आज किती वाईट वाटायला लागलं स्वतःवर आल्यावर. मी माझ्या जातीकडून बोललो. जर माझं सगळं खरं निघालं तर एसआयटीला मात्र देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकावं लागेल. यंत्रणा मात्र घटनेला धरून आणि कायद्याला धरून वापरा", असं आव्हान जरांगे यांनी दिले.
हेही वाचा >> आंदोलनासाठी जरांगेंनी अंतरवालीच का निवडलं? असा आहे गावाचा इतिहास
यावेळी जरांगे यांनी सांगितलं की, "ईडीसारखी भीती दाखवून लोक मध्ये टाकण्यासारखी नका टाकू. तुम्ही निष्पक्षपातीपणाने लढा, ज्याने माझ्याविरुद्ध लावली त्यालाच जेलमध्ये टाकावं लागेल. कारण मला माहितीये की, माघारी मी आलोय की कोण आलंय. आता एसआयटीसमोरच सांगतो."
त्याला नारायण राणेंनी नेलं -जरांगे पाटील
दगडफेक तुम्ही करायला लावली असा आरोप तुमच्या सहकाऱ्यांनी केला. त्याचा उल्लेख विधानसभेत केला आहे, या मुद्द्यावर मनोज जरांगे म्हणाले, "अहो त्याचं कामच ते आहे. त्याला नेलं इथून नारायण राणेंनी. मराठ्याचं वाटोळ करण्यासाठी. तुला माहिती होतं, तर याचा अर्थ त्यानेच तुला पाठवलं असेल, कर यांच्यात दंगल म्हणून. आम्ही शांततेत बसलो होतो. माझ्या डोळ्यात धूर गेला होता. मला सुरूवात दिसली नंतर काहीच दिसलं नाही. पोलीस मारणार आहेत का हेच कुणाला माहिती नव्हतं. त्याचे व्हिडीओ आहेत", अशी माहिती जरांगेंनी यावेळी दिली.
"हजार जण आले आणि हानायला लागले. इतका धूर झाला की, कुणालाच कळेना काय झालं ते. कोण हाणेल. तुला जर माहिती होतं... नारायण राणेचं ऐकून जातीचं वाटोळ करायला निघाला. नेत्याचं किती ऐकावं, तुला तरी काही वाटलं पाहिजे" अशी टीका जरांगेंनी फडणवीसांवर केली.
"कोण कुणाची आयबहीण काढत असेल, तर देवेंद्र फडणवीस तुमच्या पाठीशी असेल, असे फडणवीस विधानसभेत म्हणाले. त्यावर जरांगे म्हणाले, "किती वाईट वाटलं. आमच्या आई बहिणीच्या छाताडावर नाचलात. वरून गोळ्या घातल्या तुम्ही. तेव्हा नाही का वाईट वाटलं? आज किती वाईट वाटलं. माझ्या आयाबहिणींच्या मुंडक्यावर पाय दिलेत. वरून मारलं. एका महिलेला २०-२० पोलीस मारत होते. उचलून आपटता. डोक्यात विटा मारता", असा संताप जरांगेंनी व्यक्त केला.
Manoj Jarange : "मी ५० वर्षे शिक्षा भोगायला तयार"
एसआयटी चौकशीबद्दल जरांगे म्हणाले, "तुमची नुसती आय म्हणालो तर किती लागलं. आमच्या आयाबहीण उभ्या चिरल्यात तुम्ही. एसआयटी नेमणाऱ्या तेव्हा कुठे गेला होता? सत्ता हातात आली म्हणून दुरूपयोग करून लोक तुझ्याकडे घ्यायला लागला का सगळे? तुझ्या एसआयटीला आणि चौकशीला घाबरून माझ्या आईबहिणीचे मुडदे पडू देऊ का मी? नाही पडू देणार. तू टाक जेलमध्ये मी ५० वर्षे सजा भोगायला तयार आहे."
"आमच्या आईबहिणीच्या डोक्याच्या चिंधड्या चिंधड्या झाल्यात. चारही बाजूंनी त्यांना टाके आहेत. काय बोलतो? पाय मोडलेत. पायात गोळ्या आहेत. तुझ्या आईला लागल्यावर बोलशील का? माझ्या पोलिसाला मारलं म्हणतो. हा टोळी जमवतोय. याच्या हातात सत्ता आहे म्हणून विधानभवनात माझ्याविरूद्ध एसआयटी नेमायला मंजूरी. मला जेलमध्ये टाकायला लगेच चौकशी सुरू. याच्या हातात आहे म्हणून", असा आरोप जरांगेंनी केला.
ADVERTISEMENT