Maratha Reservation : जरांगेंची मुख्यमंत्र्यांना चर्चेची विनंती, CM शिंदे म्हणाले, ‘माझे अधिकारी…’

प्रशांत गोमाणे

• 11:18 AM • 25 Jan 2024

जरांगेंना मी विनंती करतो की सरकार सकारात्मक आहे. जर सरकार सकारात्मक नसेल तर आंदोलन ठीक आहे, सरकार सकारात्मक असेल तर सहकार्याची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

manoj jarange request to cm eknath shinde to meet maratha reservation mumbai police azad maidan

manoj jarange request to cm eknath shinde to meet maratha reservation mumbai police azad maidan

follow google news

Cm Eknath shinde Reaction on Maratha Protest : लोणावळ्यात आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची सरकारच्या शिष्टमंडळासोबत बैठक झाली. मात्र या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही आणि चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर जरांगेंनी माध्यमांसमोर येऊन मुख्यमंत्री आणि दोन्ही उप मुख्यमंत्री अशा तिघांनी एकत्र येऊन चर्चा करावी आणि आरक्षणावर तोडगा काढावा, अशी विनंती केली होती. या विनंतीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अधिकारी जरांगेंच्या (Manoj Jarange) संपर्कात असल्याची माहिती दिली. तसेच कुणबी नोंदी आणि सर्वेक्षणात ज्या सूचना येत आहेत, त्या सूचना तातडीने अंमलात आणल्या जात असल्याची माहिती दिली. (manoj jarange request to cm eknath shinde to meet maratha reservation mumbai police azad maidan)

हे वाचलं का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अधिकारी जरांगेंच्या संपर्कात आहेत. कुणबी नोंदीमध्ये, सर्वेक्षणात ज्या सूचना येत आहेत, त्या सूचना तातडीने अंमलात आणल्या जात आहेत. सरकारची भूमिका कालही तिच होती आजही तिच आहे. इतर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे,असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हे ही वाचा : Video : मराठा सर्वेक्षणाचा सावळा गोंधळ, पहिली पास व्यक्तीकडून होतोय सर्वे

मागासवर्ग आयोग मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षणाचे काम करतोय. एक लाख 40 हजार लोक काम करत आहेत. त्यामुळे सर्वेचे काम जोरदार सूरू आहे. तसचे कुणबी नोंदी देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे जरांगेंना मी विनंती करतो की सरकार सकारात्मक आहे. जर सरकार सकारात्मक नसेल तर आंदोलन ठीक आहे, सरकार सकारात्मक असेल तर सहकार्याची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

जरांगेंची सरकारला विनंती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्यक्ष येऊन भेटाव आणि या प्रकरणात लक्ष घालाव, चर्चा करावी आणि तोडगा काढावा, अशी शेवटची विनंती मराठा समाजाच्या वतीने करत असल्याचे जरांगे यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा : Crime : अकोला हादरलं! आधी प्रेयसीचा गळा चिरला मग स्वत:ला संपवलं

त्यांचं एक मोठ शिष्टमंडळ य़ेणार आहे. हे शिष्टमंडळ परीपत्रक, शासन निर्णय आणि आदेश घेऊन येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे जरांगे सांगतात. यावर जरांगेनी त्यांनाच येऊ द्या, तिथपर्यंत आम्ही मुंबईत जातो,असे त्यांनी सांगितले. मी नाही थांबू शकत, मला जात महत्वाची आहे. त्यांचे शिष्टमंडळ जिकडे येईल तिकडे आम्ही थांबू. आणि आम्ही मजा करायला आलो नाही, लोक थंडीत झोपतायत,जितके मुंबईकरांचे हाल आहेत तितके आमचेही होतायत, असे देखील जरांगेंनी सांगितले.

    follow whatsapp