Maratha Morcha : राज्यात गेल्या कांही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी चालेल्या आंदोलनावरून संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. ज्या मनोज जरांगे-पाटील यांच्या आठ दिवसांपासून चाललेल्या उपोषणामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही जरांगे-पाटील (Manoj Jarange patil) यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा केली. मात्र आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवा नाही तर मला तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा त्यांनी आठ दिवसापूर्वीच दिला होता. त्यामुळे आजच्या आठव्या दिवशी जरांगे-पाटील यांनी सरकारला इशारा देत, लाठीहल्यानंतर सरकारने अश्वासन दिल्यानंतर मी पाणी सुरु केले होते, मात्र आज सरकारचा अध्यादेश आला नाहीत तर मात्र सायंकाळी पाच वाजल्यापासून पाण्याचा त्याग करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
ADVERTISEMENT
बेमुदत उपोषणचा आज आठवा दिवस
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरु केले. मात्र शांततेत हे उपोषण चालू असताना आंदोलनातील नागरिकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. यामध्ये अनेक जण जखमीही झाले आहेत. त्यानंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी जरांगे-पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली होती. सरकारने त्यांना शब्द दिल्यानंतर त्यांनी पाणी घेतले होते, मात्र आता सरकारने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढला नाही तर पाणीही त्याग करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता त्यांचे वजन कमी झाले आहे. त्याचबरोबर त्यांचा बीपी शुगरही कमी झाली आहे.
आपल्या उपोषणावर ठाम
गेल्या आठ दिवसांपासून चाललेल्या उपोषणावर बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशाराच दिला आहे. जर आज मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढला गेला नाही तर मात्र आता पाणीसुद्धा त्याग करणार असून सरकारने तात्काळ मराठा आरक्षणाविषयी निर्णय घ्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे. सरकारने याबाबत निर्णय घेतला नाही तर मात्र आपण उपोषणावर ठाण असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
पाण्याचा त्याग करणार
मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलन सुरु केल्यानंतर सरकारकडून शब्द देण्यात आला. त्यानंतर त्यांनी पाणी घेऊन सरकारकडे अध्यादेश काढण्याची विनंती केली. मात्र त्यानंतरही सरकारकडून निर्णयाच्या पातळीवर कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे मनोज जरांगे-पाटील यांनी आता मराठा आरक्षणाविषयी अध्यादेश काढला नाही तर आता पाण्याचाही त्याग करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे.
शुगर, बीपी डाऊन
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाला सुरुवात केल्यापासून त्यांनी अन्न त्याग केले आहे. त्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला. त्यावेळी जरांगे पाटील यांची प्रकृती आणखी खालवली होती. तर आताही जरांगे-पाटील यांचा बीपी आणि शुगर कमी झाला आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. अध्यादेश काढण्याची विनंती त्यांनी केली आहे. मात्र तो सरकारकडून काढण्यात आला नाही तर मात्र आता पाणीही त्याग करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर यामुळे आता हे आंदोलन आणखी तापणार असल्याचे दिसून येत आहे.
आता स्वस्थ बसणार नाही
लाठीचार्ज केल्यानंतर आंतरवाली सराटीतील परिस्थिती बदलली होती. आंतरवाली सराटीला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. त्यामुळे आता सरकारने ठोस भूमिका घेतली नाही, तर पाण्याचाही त्याग करणार असल्याचा इशारा जरांगे-पाटील यांनी दिल्यामुळे सरकार अडचणीत सापडले आहे. जर सरकारने अध्यादेश काढला नाही मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशाराच त्यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT