Mazi Ladki Bahin Yojana Payment: पहिला हफ्ता तीन हजारांचा, 'या' तारखेला खात्यात होणार जमा

रोहिणी ठोंबरे

31 Jul 2024 (अपडेटेड: 01 Aug 2024, 09:54 AM)

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 1st Installment : राज्य सरकारने या अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेची घोषणा होताच राज्यभरातील महिलांचा याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

'माझी लाडकी बहीण योजने'चे पैसे कधी मिळणार

point

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

point

योजनेचा लाभ फक्त 'या' महिलांनाच मिळणार

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 1st Installment : राज्य सरकारने या अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेची घोषणा होताच राज्यभरातील महिलांचा याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिला लांब रांगा लाऊन अर्ज दाखल करत आहेत. ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरुन घेतले जात आहेत. या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातील. राज्यातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यावर सरकार दरमहा ही रक्कम पाठवणार आहे. पण याचा पहिला हफ्ता कधी मिळणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana when will get 1st Installment to maharashtra women)

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता हा 3 हजार रूपयांचा असणार आहे. महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार आहेत. हे पैसे 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील पात्र महिलांना अर्ज करावा लागणार आहे. महिला या योजनेचा फॉर्म ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही भरू शकतात. अर्ज भरल्यानंतर, सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता ऑगस्ट महिन्यात जारी करेल.

हेही वाचा : Maratha Reservation : "मराठा आरक्षणाचे खरे कट्टर विरोधक उद्धव ठाकरेच"

अशा परिस्थितीत जर तुम्हालाही या सरकारी योजनेचा लाभ घ्यायची इच्छा असेल, तर आजची पोस्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना लागू करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या विविध विभागांकडे असलेला जुना डेटा घेण्यात येणार आहे. इतर योजनेतील लाभार्थी महिलांची माहिती त्यामुळे सरकारला मिळणार आहे.

हेही वाचा : Maharashtra Weather : मुंबई, पुणे,कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांमध्ये पाऊस घालणार धुमाकूळ!

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

महाराष्ट्रातील जवळपास अडीच कोटी महिलांना याचा योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती आहे. इतक्या महिलांची माहिती घेऊन ती पडताळणी करणे इतक्या कमी वेळात शक्य नाही. त्यामुळे सरकारने ही युक्ती लढवली आहे. 31 ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज करता येणार आहे. त्यानंतर 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा : Akola MNS: मनसेला हादरवणारी बातमी, अमोल मिटकरींची गाडी फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू!

योजनेचा लाभ फक्त 'या' महिलांनाच मिळणार

या योजनेसाठी महिलांनी अर्ज केल्यास त्यांना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळेल. याशिवाय, ज्या महिलेने या योजनेचे सर्व पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत. त्यांनाच योजनेचा पहिला हप्ता मिळेल. अपात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

    follow whatsapp