Mumbai Rain: मुंबईत पुन्हा 26 जुलै?, पावसाचा LIVE Video पाहून भरेल धडकी!

मुंबई तक

25 Jul 2024 (अपडेटेड: 25 Jul 2024, 09:17 PM)

Mumbai Rain Update: मुंबई आणि उपनगरात मागील 24 तासात प्रचंड पाऊस बरसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईत 26 जुलैसारखी परिस्थिती निर्माण होणार का अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबईत पुन्हा 26 जुलै?, पावसाचा LIVE Video पाहून भरेल धडकी!

मुंबईत पुन्हा 26 जुलै?, पावसाचा LIVE Video पाहून भरेल धडकी!

follow google news

मुंबई: मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मागील 24 तासापासून मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. दरम्यान, मुंबईत मागील काही तासात पावसाने थोडीशी उसंत घेतली होती. पण आता पावसाने संध्याकाळी पुन्हा एकदा जोर धरला आहे. मुंबईतील पावसाचा हा जोर पाहता मुंबईत पुन्हा 26 जुलैसारखी परिस्थिती होईल का? अशी भीती आता मुंबईकरांकडून व्यक्त केली जात आहे.

हे वाचलं का?

पुढील २४ तासाकरिता अतिमुसळधार पावसाचा इशारा

IMD यांनी मुंबई, मुंबई उपनगर, रत्नागिरी, पालघर ,ठाणे या जिल्ह्यात पुढील २४ तासाकरिता अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अशोक शिनगारे यांनी उद्या शुक्रवार, दि.26 जुलै 2024 रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा व  महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली

मोडकसागर लवकरच भरण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने वैतरणा आणि तानसा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा धरणाच्या पाणीपातळीने कमाल पातळी गाठली असून बुधवारी दुपारी चार ते सव्वा चारच्या दरम्यान तिचे तीन दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे 3315 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.

हे ही वाचा>> Mahabaleshwar: महाबळेश्वरला जाताय?, 'ही' बातमी वाचा अन् तुम्हीच काय ते ठरवा!

त्याचवेळी सायंकाळी 7 नंतर मिळालेल्या माहितीनुसार एकूण 11 दरवाजे उघडण्यात आल्याने 12155 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला. त्यामुळे शहापूर, भिवंडी, वाडा आणि वसई तालुक्यातील तानसा नदीच्या काठावर वसलेल्या ३३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच मोडकसागर धरणही लवकरच भरण्याची शक्यता आहे. या धरणाची पाणीपातळी 160.72 मीटर टीएचडी आहे. मोडक सागर धरणाची ओव्हरफ्लो पातळी 163.15 मीटर THD आहे. मोडकसागर धरण परिसरात पावसाची संततधार सुरू असून सध्याची पावसाची परिस्थिती पाहता मोडकसागर धरण लवकरच भरण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा>> Pune Flood मुळं Ajit Pawar फिल्डवर, कुणाला फोन केला?

त्यामुळे पालघर आणि वाडा तालुक्यातील वैतरणा नदीच्या काठावर वसलेल्या 42 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व संबंधित शासकीय यंत्रणा, तहसील कार्यालय, पोलीस यंत्रणा व सर्व संबंधित अधिकारी आवश्यक कार्यवाहीसाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून, त्यामुळे पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. सध्या विहार, तुळशी, तानसा आणि मोडकसागर हे चार जलाशय भरून वाहत आहेत.आज सकाळी ६ वाजेपर्यंत जलाशयांमधील पाणीसाठा ६६.७७ टक्क्यांवर पोहोचला आहे. एकूण परिस्थिती पाहता मुंबईच्या पाणीपुरवठ्यातील 10% पाणीकपात सोमवार, 29 जुलै 2024 पासून मागे घेतली जाईल. BMC सोमवार, २९ जुलै २०२४ पासून ठाणे शहर, भिवंडी आणि शहराबाहेरील ग्रामपंचायतींना 10% पाणीकपात मागे घेत आहे, जिथे BMC द्वारे पाणी पुरवठा केला जातो.


 

 

 

 

    follow whatsapp