Mumbai Weather Latest News : गेल्या 24 तासांपासून संततधार सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुंबईत पुढील काही तास अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय विभागाने वर्तवला आहे. (IMD Predicts Heavy to very Heavy rainfall in Mumbai)
ADVERTISEMENT
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. राज्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, पुढील काही तासही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
मुंबईतील हवामानाचा अंदाज काय?
मुंबईसाठी २० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. पुढील २४ तासांत म्हणजे २१ जुलै रोजीही अतिमुसळधार पाऊस पडणार असा अंदाज आहे.
हेही वाचा >> आधी जरांगेंना पाठिंबा आता विरोध, आंबेडकरांच्या यात्रेचा अर्थ काय?
मुंबई उपनगरातही पावसाचा जोर कायम राहिल. हवामान विभागाने मुंबई शहर आणि उपनगरासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
हेही वाचा >> "सत्तेतल्या बोक्यांनो मस्ती आली काय?", काँग्रेसचे साँग, महायुतीवर वार
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसाची संततधार कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
महाराष्ट्रात कसे असेल हवामान?
रायगड, रत्नागिरी, सातारा, अमरावती, अकोला, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पुढील काही दिवस पाऊस सुरूच राहिल असा अंदाज आहे.
ADVERTISEMENT