Weather Update : थंडी वाढली, प्रदुषणाची पातळीही वाढली? मुंबईत सध्या वातावरण कसं?

मुंबई तक

02 Dec 2024 (अपडेटेड: 02 Dec 2024, 09:08 AM)

मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये AQI खूप वाढला आहे. ढासळलेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांची जळजळ होणे यासारख्या समस्या अनेकांना भेडसावत आहेत.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईमध्ये थंडी वाढली...

point

मुंबईमध्ये हवेती गुणवत्ता ढासळली?

point

आठवडाभर कसं राहील तापमान?

Mumbai Weather Updates : राज्यात सध्या थंडीची लाट आली असून, मुंबईतही आता थंडी वाढली आहे. मुंबईत आज किमान तापमान 25.83 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार , ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान 27.66 सेल्सिअस पर्यंत असेल असा अंदाज आहे. काल मुंबईत किमान तापमान 26.28 सेल्सिअस, तर कमाल तापमान 29.53 सेल्सिअस पर्यंत नोंदवलं गेलं. तर काल सकाळी 53 टक्के आर्द्रता नोंदवली गेली होती. आज सूर्योदय 06:56 मिनिटांनी झाला असून, 18:00:वाजता सूर्यास्त होईल.

हे वाचलं का?

मुंबईतील AQI 252 वर...

हे ही वाचा Maharashtra New CM LIVE : एकनाथ शिंदे यांना हवी असलेली खाती मिळणार? राजकीय घडामोडींचा अर्थ काय?

दिवसेंदिवस मुंबईत प्रदुषण वाढत जाताना दिसतंय. अशातच AQI खूप वाढला आहे. ढासळलेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांची जळजळ होणे यासारख्या समस्या अनेकांना भेडसावत आहेत. AQI जितका जास्त असेल तितकी वायू प्रदूषणाची पातळी जास्त आणि आरोग्याची चिंता जास्त वाढणार आहे. 50 किंवा त्यापेक्षा कमी AQI हवेची चांगली गुणवत्ता दर्शवतो, तर 300 पेक्षा जास्त AQI धोकादायक हवेची गुणवत्ता दर्शवते. आज मुंबईतील अनेक भागांमध्ये AQI हा किमान 150 ते जास्तीतजास्त 300 पर्यंत आहे. वाढता AQI भविष्याची चिंता वाढवणार आहे.

आठवडाभर कसं राहील मुंबईचं हवामान? 

मुंबईत 03 डिसेंबर 2024 चे हवामान : कमाल तापमान 29.53 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26.28 अंश सेल्सिअस असू शकतं. तसंच ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे.

मुंबईत 04 डिसेंबर 2024 चे हवामान : कमाल तापमान 30.68 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27.37 अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकतं. तर ढगाळ वातावरण राहील अशी शक्यता आहे.

मुंबईत 05 डिसेंबर 2024 चे हवामान : कमाल तापमान 30.03 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27.88 अंश सेल्सिअस असू शकतं. ढगाळ आकाश राहील असा अंदाज आहे. 

हे ही वाचा >>EVM Hacking Row : "इव्हीएम हॅकींगचा दावा खोटा...", निवडणूक आयोगाची माहिती, 'त्या' व्यक्तिविरोधात FIR

मुंबईत 06 डिसेंबर 2024 चे हवामान : कमाल तापमान 28.71 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27.3 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल अशी शक्यता आहे. 

मुंबईत 07 डिसेंबर 2024 चे हवामान : कमाल तापमान 27.84 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25.96 अंश सेल्सिअस असू शकते. ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp