Nag Panchami 2024 Pooja Muhurat: नागपंचमी हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. यंदा नागपंचमी उद्या (9 ऑगस्ट) साजरी केली जाणार आहे. यावेळी नागपंचमीची तारीख ही खूप खास असणार आहे. वास्तविक नागपंचमीला सिद्धी योग, रवियोग आणि हस्त नक्षत्र यांचा संयोग होणार आहे. (nag panchami 2024 when is the auspicious time of nag panchami when to worship snake rituals and remedies)
ADVERTISEMENT
नागपंचमीच्या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. या दिवशी लोक मंदिरात जाऊन भगवान शंकराला जलाभिषेक करतात. चला तर मग जाणून घेऊया नागपंचमीला पूजेसाठी किती तासांचा शुभ मुहूर्त असेल.
हे ही वाचा>> Vinayaka Chaturthi 2024: गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी करा 'हे' उपाय
यावेळी नागपंचमीची तिथी 9 ऑगस्ट रोजी पहाटे 12:36 वाजता सुरू होईल आणि पंचमीची तिथी 10 ऑगस्ट रोजी पहाटे 3:14 वाजता संपेल.
नागपंचमी शुभ मुहूर्त
नागपंचमीच्या दिवशी सकाळी 5.47 ते 8.27 पर्यंत पुजेची वेळ असेल. पुजेची वेळ 2 तास 40 मिनिटांची असेल. उदयतिथीनुसार यावेळी नागपंचमी 9 ऑगस्टलाच साजरी केली जाणार आहे.
नागपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून भगवान शंकराचे स्मरण करून जलाभिषेक करावा. नंतर शंकराच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण करावे. त्यानंतर भगवान शंकराच्या गळ्यात असलेल्या नागाची पूजा करावी.
नागपंचमीची पूजा पद्धत
यावेळी नागाच्या प्रतिमेला हळद, तांदूळ आणि फुले अर्पण करा. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शेण, गेरू किंवा माती टाकून सापाचा आकार बनवा आणि त्याचीही पूजा करा.
हे ही वाचा>> Ganesh Chaturthi 2024: यंदा कधी आहे गणेश चतुर्थी? जाणून घ्या तिथी, पूजेचा मुहूर्त
नागपंचमीच्या दिवशी 'या' गोष्टी करू नका...
नागपंचमीला शिवाची पूजा केल्याशिवाय कधीही नागाची पूजा करू नका. म्हणजेच स्वतंत्रपणे नागाची पूजा करणे टाळा. त्यांची पूजा फक्त भगवान शिवाचे अलंकार म्हणून करा. ज्यांना सापांचा आशीर्वाद घ्यायचा आहे, त्यांनी या दिवशी जमीन खोदू नये आणि हिरव्या भाज्या तोडू नयेत. अशी मान्यता आहे..
हे आहेत उपाय फायदेशीर
दोन चांदीचे नाग आणि एक स्वस्तिक बनवा. एका ताटात नाग आणि दुसऱ्या ताटात स्वस्तिक ठेवून पूजा करावी. नागाला कच्चे दूध आणि स्वस्तिकला बेलपत्र अर्पण करा. "ओम नागेंद्रहाराय नमः" चा जप करा. यानंतर शिवलिंगावर नाग अर्पण करून गळ्यात स्वस्तिक धारण करावे.
ADVERTISEMENT