Nagpur : पावसाने घेतला दोन जणांचा जीव, एक अजूनही बेपत्ता

योगेश पांडे

21 Jul 2024 (अपडेटेड: 21 Jul 2024, 09:46 PM)

Nagpur News : नागपूर शहरात शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे वेगवेगळ्या घटनेत तीन व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली होती.यामधील दोघांचे मृतदेह सापडले आहेत आणि 12 वर्षीय मुलाचा शोध सूरू आहे.

nagpur rain news two dead one missing due to heavy rains nagpur rain story

अतिवृष्टीमुळे तीन व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुदैवी घटना घडली होती.

follow google news

बातम्या हायलाइट

point

नागपूरात पावसाने हाहाकार माजवला आहे.

point

अतिवृष्टीमुळे तीन व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना

point

दोघांचे मृतदेह हाती लागले असून एकाच अद्याप शोध सुरु आहे.

Nagpur News : नागपूरात पावसाने हाहाकार माजवला आहे. या पावसामुळे निर्माण झालेल्या अतिवृष्टीमुळे  तीन व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुदैवी घटना घडली होती. यामधील दोघांचे मृतदेह हाती लागले असून एकाच अद्याप शोध सुरु आहे. यामधील भोजराज बुलीचंद पटले (52)  आणि सुधा विश्वेश्वरराव वेरुळकर (85) यांचा मृत्यू झाला आहे. तर 12 वर्षीय श्रावण विजय तुलसिकर याचा शोध सुरू आहे. या घटनेने नागपूरात हळहळ व्यक्त होतं आहे. (nagpur rain news two dead one missing due to heavy rains nagpur rain story) 

हे वाचलं का?

नागपूर शहरात शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे वेगवेगळ्या घटनेत तीन व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली होती. श्यामनगर पुनापूर भागातील भोजराज बुलीचंद पटले (५२)  हे नाल्याच्या बाजूने उभे असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि पाण्याचा प्रवाहात ते वाहून गेल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर त्यांचा मृतदेह सापडला होता. 

हे ही वाचा : Amit Shah :  ठाकरे-पवारांवर शाहांचा सर्वात मोठा हल्ला! भाजपची विधानसभेची ‘लाईन’ ठरली?

अन्य एका दुर्घटनेत बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीत नरेंद्र नगर भागातील श्रीहरी सोसायटी मधील सुधा विश्वेश्वरराव वेरुळकर (८५)  या मानसिक रुग्ण महिला बेलतरोडी ते बेसा लगतच्या नाल्याचा पूर पाहण्याकरिता गेल्या असता पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्या. रविवारी 21 जुलैला सकाळी  श्यामनगर परिसरातील नाल्यातून  त्यांचा मृतदेह काढण्यात आला होता. 

यासह भरतवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील मोहनबाबा नगर परिसरात श्रावण विजय तुलसिकर (१२) हा नाल्याच्या बाजूने खेळत असतांना पाण्याच्या प्रवाहाने वाहत गेला. या मुलाचा मृतदेह अजूनपर्यंत सापडलेला नाही. याचा शोध घेतला जात आहे. 

दरम्यान भरतवाडा, पूनापूर व सोमलवाडा येथील तलाठ्यांच्या  प्राथमिक चौकशी अहवालातील माहिती नागपूरचे (शहर) तहसीलदार संतोष खांडरे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांना सादर केली आहे. अतिवृष्टीमुळे तीन व्यक्ती पुराच्या पाण्यामध्ये वाहत गेल्याचे या अहवालात आढळून आले आहे. या घटनेने सध्या नागपूरमध्ये हळहळ व्यक्त होतं आहे. 

हे ही वाचा : Ajit Pawar: ''विधानसभा महायुतीत लढू, पण...'', अजित पवारांचा कार्यकर्त्यांना ‘मेसेज’

सहा तासांमध्ये २१७ मिमी विक्रमी पाऊस

शनिवारी सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासात कुलाबा वेधशाळेत ११४.७ मिमी तर सांताक्रुझ (उपनगरात) ९२.९. मिमी पाऊस झाला.यानंतर सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरी भागात ६३.५६ मिमी, पूर्व उपनगरात ४९.६८ मिमी आणि पश्चिम उपनगरात ३८.१८ मिमी पावसाची नोंद झाली.

    follow whatsapp