Sambhajinagar Hospital : नांदेडमधील शासकीय रुग्णालयामध्ये 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू (24 patients died) झाल्याने मोठी खळबळ उडाली. त्यामध्ये 12 नवजात बालकांचा समावेश होता. त्यामुळे शासकीय आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. नांदेडच्या घटनेनंतर आता संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातही (Ghati Hospital sambhajinagar) 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. संभाजीनगरमध्येही 10 पैकी 2 नवजात बालकांचा समावेश असल्याने आता येथीलही आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
मृत्यूचे तांडव
नांदेडमधील शासकीय रुग्णालयात चौवीस तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे उघड झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता तशीच घटना संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातही घडली आहे. त्यामुळे संभाजीनगरमधील घाटीत मृत्यूचे तांडव पाहायला मिळाल्याचे मत व्यक्त होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याला जबाबदार कोण असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.
हे ही वाचा >> कांदा संकटाला ब्रेक, आजपासून लिलाव होणार सुरू, सरकार म्हणाले…
शासकीय कारभाराच भोंगळ कारभार
गेल्या काही दिवसांपासून शासकीय रुग्णालयातील औषध पुरवठा कमी होत आहे. त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. अपुऱ्या औषध पुरवठ्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळले जात असल्याचा आरोप जनसामान्यातून केला जात आहे. तर काही ठिकाणी काही दिवसांचाच औषध पुरवठा असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
जनसामान्यांचा आधार ‘घाटी’
संभाजीनगरमध्ये असलेले घाटी रुग्णालय हे अनेक तालुक्यांसाठी आधाराचे केंद्र आहे. मात्र गेल्या चोवीस तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याने घाटी रुग्णालयाच्या प्रशासनावर सवाल उपस्थित केला जात आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांसाठी घाटी रुग्णालय हे आधाराचे केंद्रबिंदू आहे. मात्र नांदेडनंतर घाटी रुग्णालयात मृत्यूने थैमान घातल्याने याला जबाबदार कोण असा सवाल करत जनसामान्यांच्या जीवाशी खेळू नका अशी भावना व्यक्त केली जात आहे.
10 पैकी 2 बालकांचा समावेश
संभाजीनगरातील घाटी रुग्णालयामध्ये चोवीस तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 2 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरच अनेक सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. नवजात बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने घाटी रुग्णालयाच्या प्रशासनावर आणि औषध पुरवठ्यावरही सवाल करण्यात आला आहे.
हे ही वाचा >> धक्कादायक! लेखक राजन खान यांच्या मुलाची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले कारण
अपुरा औषध पुरवठा
हाफकीनकडून औषध खरेदी बंद करण्यात आल्याने अनेक रुग्णालयामध्ये अपुरा औषध पुरवठा असल्याचे सांगण्यात आले आहे. जर शासकीय रुग्णालयात अपुरा औषध पुरवठा होत असेल, रुग्णांना वेळेत औषधं मिळत नसतील तर जनसामान्यांच्या आरोग्याचे काय असा सवालही केला जात आहे. नांदेडनंतर संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यू झाला त्यामुळे आता राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयातील परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
ADVERTISEMENT