Onion Strike : नाशिक जिल्ह्यात गेल्या 13 दिवसांपासून सुरू असलेल्या कांद्याच्या संकटाला अखेर ब्रेक लागला. कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप मागे घेण्यात आला आहे. यामुळे कांदा उत्पादक (Onion grower) शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून मंगळवार 3 ऑक्टोबरपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये (Market Committee of Nashik) पुन्हा एकदा कांद्याचे लिलाव (auction) सुरू होणार आहेत.
ADVERTISEMENT
आंदोलन मागे
शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी दोन पावले मागे घेत केंद्र व राज्य सरकार आपल्यासमोर ठेवलेल्या मागण्यांवर महिनाभरात निर्णय घेईल, या अटीवर आंदोलन मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी हा निर्णय जाहीर केला. राज्य आणि केंद्राच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
हे ही वाचा >> धक्कादायक! लेखक राजन खान यांच्या मुलाची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले कारण
राज्य-केंद्राची बैठक
व्यापाऱ्यांच्या कोअर कमिटीच्या बैठकीत याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. कांदा व्यापाऱ्यांनी आपल्या काही मागण्या सरकारसमोर मांडल्या होत्या. यासंदर्भात दिल्लीत केंद्रीय पातळीवर बैठकही घेण्यात आली होती. मात्र त्यावर तोडगा निघू शकला नाही. यानंतर कांदा व्यापाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले होते. मात्र शेतकऱ्यांचे वाढते नुकसान पाहता व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा >> Buldhana : खामगावात गजानन महाराज प्रगटले? तोतया की बहुरूपी…भक्तांची दर्शनासाठी गर्दी
व्यापाऱ्यांच्या मागण्या कायम
केंद्र आणि राज्य सरकारकडून कांदा व्यापाऱ्यांच्या मागण्या सोडवण्याचे अश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे ठप्प असलेली बाजारपेठ आता खुली होणार आहे. यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसाठी मागण्या कायम ठेऊन आंदोलन मागे घेत असल्याचे बाजार समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT