Odisha train accident update news : ओडिशातील तिहेरी रेल्वे अपघाताने देश हादरून गेला. या भीषण अपघातात 288 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 1100 प्रवाशी जखमी झाले आहेत. सिग्नल बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे मानले जात आहे. मात्र, रेल्वेकडून चौकशी सुरू आहे. या घटनेला 62 तास उलटल्यानंतरही तिन्ही रेल्वेच्या वाहनचालकांचे आणि गार्डचे काय झाले, याबद्दल लोक माहिती शोधत आहेत. तर दोन गाड्यांचे लोको पायलट (ड्रायव्हर) आणि गार्ड जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी ओडिशातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात इंजिन चालक आणि मालगाडीचा गार्ड थोडक्यात बचावला आहे. (train accident news today)
ADVERTISEMENT
कोरोमंडल एक्स्प्रेसचा लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट आणि गार्ड यांच्यासह बंगळुरू-हावडा एक्स्प्रेसचा चालक आणि गार्ड जखमींच्या यादीत होते, असे दक्षिण पूर्व रेल्वेच्या खरगपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक राजेश कुमार यांनी सांगितले. सर्व जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चालकांनी दिलेली माहिती काय?
तीन गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या अपघाताबद्दल रेल्वे बोर्डाने आणखी एक माहिती दिली आहे. सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचे बोर्डाने चालकांनी दिलेल्या माहितीनुसार सांगितले आहे.
ड्रायव्हरने सांगितले का घडला अपघात?
कोरोमंडल एक्स्प्रेसच्या ड्रायव्हरने सांगितले की, ग्रीन सिग्नल पाहूनच पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता. दुसरीकडे यशवंतपूर एक्स्प्रेसच्या चालकाने अपघातापूर्वी विचित्र आवाज ऐकल्याचा दावा केला आहे. या भीषण अपघातात कोरोमंडल ट्रेनला सर्वाधिक फटका बसला आहे.
अपघात कसा झाला?
रेल्वेकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार ट्रेन क्रमांक 12481 कोरोमंडल एक्सप्रेस बहंगा बाजार स्टेशनच्या (शालिमार-मद्रास) मुख्य मार्गावरून जात होती. त्याचवेळी ती रुळावरून घसरली आणि अप लूप मार्गावर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. ट्रेन पूर्ण वेगाने धावत होती, त्यामुळे 21 डबे रुळावरून घसरले आणि 3 डबे दुसऱ्या रेल्वेमार्गावर गेले.
Video >> ‘हॅलो मोदी’, राहुल गांधींनी मुलाखतीत फोन काढला अन्…, काय घडलं?
प्रत्येक रेल्वे स्टेशनला दुसरी ट्रेन क्रॉस करण्यासाठी लूप लाइन असते. बहनगा बाजार स्टेशनवर अप आणि डाऊन अशा दोन लूप लाइन आहेत. स्टेशनवरून दुसऱ्या ट्रेनला रस्ता करून द्यायचा असतो, त्यावेळी दुसरी ट्रेन लूप लाइनवर उभी केली जाते.
खरंतर, बहनगा बाजार स्थानकावर या गाड्यांना थांबा नाही. त्यामुळे दोन्ही गाड्यांचा वेग खूप होता. बहनगा बाजार स्थानकावरून जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस अचानक रुळावरून घसरल्याने मालगाडीचे काही डबे मालगाडीला धडकले. दरम्यान, अपघाताच्या वेळी डाऊन मार्गावरून जाणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसचे मागचे दोन डबेही रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसवर जाऊन आदळले.
हेही वाचा >> ‘कानाखालीच आवाज काढेन’, अजित पवार राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर भडकले
भुवनेश्वर रेल्वे स्थानकापासून सुमारे 171 किमी आणि खरगपूर रेल्वे स्थानकापासून सुमारे 166 किमी अंतरावर बालासोर जिल्ह्यातील बहंगा बाजार स्थानकावर हा अपघात झाला.
इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमुळे अपघात झाला : रेल्वेमंत्री
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, “रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्यामुळे हा अपघात झाला. तपास अहवाल येऊ द्या. आम्ही घटनेची कारणे आणि त्यासाठी जबाबदार लोक ओळखले आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.”
ADVERTISEMENT