Train Jugaad Video : प्रवाशांनो! मुंबई लोकलमध्ये सीट नाही मिळत? 'या' व्यक्तीने केला भन्नाट जुगाड

मुंबई तक

10 Nov 2024 (अपडेटेड: 10 Nov 2024, 03:40 PM)

Passenger Seat Jugaad In Mumbai Train : लाखो प्रवाशांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलने प्रवास करताना भल्या भल्यांची दमछाक उडते. रेल्वे स्थानकावर ट्रेनचं आगमन होताच सीट मिळवण्यासाठी सर्वच प्रवासी धडपड करत असतात.

Mumbai Local Train Seat Jugaad Video

Mumbai Local Train Seat Jugaad Video

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई लोकल ट्रेनमध्ये सीट मिळवण्यासाठी प्रवाशाने केला भन्नाट जुगाड

point

प्रवाशाच्या जुगाडाचा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

point

व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी केला प्रतिक्रियांचा वर्षाव

Passenger Seat Jugaad In Mumbai Train : लाखो प्रवाशांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलने प्रवास करताना भल्या भल्यांची दमछाक उडते. रेल्वे स्थानकावर ट्रेनचं आगमन होताच सीट मिळवण्यासाठी सर्वच प्रवासी धडपड करत असतात.  'हाजीर तो वजीर' असं म्हटलं जातं, पण मुंबई लोकल ट्रेनमध्ये सीट न मिळाल्यानंतर एका प्रवाशाने भन्नाट जुगाड केला. या प्रवाशाचा जुगाडाचा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. जुगाडाचे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात. पण या प्रवाशाने चक्क ट्रेनमध्ये केलेल्या जुगाडाचा व्हिडीओ पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

हे वाचलं का?

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, लोकल ट्रेनमध्ये सीटवर सर्व प्रवासी बसल्यानंतर एका व्यक्तीने सीट मिळवण्याची अनोखा जुगाड केला. या प्रवाशाने त्याच्या जवळ असलेला छोटा पोर्टेबल स्टूल बाहेर काढला आणि दोन्ही सीटच्या मधोमध ठेवला. त्यामुळे या प्रवाशाला लोकल ट्रेनमध्ये झालेल्या गर्दीतही सीट उपलब्ध करता आली.

हे ही वाचा >> Amit Shah : "आता आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पण निवडणुकीनंतर...", अमित शाह 'हे' काय बोलून गेले

विशेष म्हणजे या व्यक्तीने ट्रेनमध्ये सीन न मिळाल्यानंतर व्यवस्थित बसता यावं, यासाठी हा पोर्टेबल स्टूल बॅगेत ठेवल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. सीटवर प्रवासी बसल्यानंतर या व्यक्तीने बॅगमधून स्टूल बाहेर काढला आणि त्यावर आरामात बसला. हे पाहून इतर प्रवासाही थक्क झाले. तसच व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स म्हणाले, 'ही सीट तर दुसऱ्यांपेक्षा जास्त आरामदायक आहे.' 

हे ही वाचा >> Raj Thackeray Exclusive : 'माझी पाचवी निवडणूक, तुमची पहिली...', CM शिंदेंना राज ठाकरेंनी थेट सुनावलं!

हा जुगाडाचा व्हिडीओ @borivali_Churchgate_bhajan नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. प्रवाशाचा हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून या व्हिडीओला 4 मिलियनहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तसच नेटकऱ्यांनीही भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने म्हटलं, 'विंडो सीट प्रो मॅक्स...'. दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, आता मुंबई लोकलमध्ये लोक अशाचप्रकारचा जुगाड करतील. तर अन्य एका यूजरने म्हटलं, याची सीट इतरांपेक्षा जास्त आरामदायक आहे.

    follow whatsapp