Nepal Plane Crash: काठमांडूत भयंकर अपघात! उड्डाण करताच कोसळले विमान अन्...

मुंबई तक

24 Jul 2024 (अपडेटेड: 24 Jul 2024, 12:29 PM)

Plane Crash in Nepal, Kathmandu: नेपाळमधील काठमांडू आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचा भीषण अपघात झाला. उड्डाण केल्यानंतर विमान कोसळले. 

काठमांडूमधील त्रिभुवन विमानतळावर एक प्रवासी विमान कोसळल्याची घटना घडली आहे.

नेपाळमधील काठमांडू शहरात प्रवाशी विमान कोसळल्याची घटना घडली.

follow google news

बातम्या हायलाइट

point

नेपाळमध्ये प्रवासी विमान कोसळले

point

काठमांडूमधील त्रिभुवन विमानतळावरील घटना

point

विमानामधून १९ प्रवासी करत होते प्रवास

Kathmandu plane crash: नेपाळमधील काठमांडूमध्ये भयंकर दुर्घटना घडली. एक प्रवाशी विमान हवेत झेपावल्यानंतर कोसळले. दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानाला आग लागली. या विमानामध्ये 19 प्रवास करत होते. (a plane crashed and caught fire at tribhuvan international airport in nepal)

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, काठमांडूतील त्रिभुवन विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर प्रवाशी विमान दुर्घटनाग्रस्त झाले. १९ प्रवासी असलेल्या विमानाच्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हेही वाचा >> "...म्हणून मी गुलाबी जॅकेट घालायला लागलो", अजित पवारांनी सांगितलं कारण

विमान कोसळले, नेमके काय घडले?

सौर्य एअरलाईन्सचे हे विमान होते. उड्डाण करत असतानाच विमान धावपट्टीवरून घसरले आणि नंतर हवेत जाऊन खाली कोसळले. खाली पडल्यानंतर विमानाला आग लागली.

हेही वाचा >> 'राज्यातल्या जमिनी विकून पैसे देऊ का?', अजितदादा संतापले

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव दलाचे पथक दाखल झाले. तातडीने आग विझवण्याचे काम सुरू करण्यात आले होते.

विमान जळून खाक

19 प्रवाशांना घेऊन हवेत झेपावलेल्या विमानाचा आग विझल्यानंतरचा व्हिडीओ आता समोर आला आहे. अपघातानंतर पेट घेतलेल्या हे विमान जळून खाक झाले आहे. 

विमानाचा सांगाडाचा शिल्लक राहिला आहे. विमानातील 19 प्रवाशी वाचण्याची शक्यता मावळली आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर त्रिभुवन विमानतळावर उतरणारी विमाने लखनौ आणि कोलकाता विमानतळाच्या दिशेने वळवण्यात आली आहे. 

 

    follow whatsapp